Karnataka Shakti scheme : कर्नाटकातील (Karnataka News) धारवाड जिल्ह्यात गुरुवारी एक विचित्र घटना घडली. बसस्थानकावर बुरखा घातलेल्या एका हिंदू व्यक्तीला पकडण्यात आले. वीरभद्रय्या मठपती नावाच्या व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या (Karnataka Gvernment) शक्ती योजनेंतर्गत (Shakti scheme) मोफत बसचे तिकीट मिळवण्यासाठी बुरखा घातला असल्याचा संशय प्रवाशांना आला. वीरभद्रय्या बसस्थानकावर एकटाच बसलेला असताना प्रवाशांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना संशय येऊ लागला. मात्र वीरभद्रय्या याने भीक मागण्यासाठी बुरखा (Burqa) घातल्याचा दावा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, वीरभद्रय्या यांच्या उत्तराने लोकांचे समाधान झाले नाही. शक्ती योजनेंतर्गत मोफत बसची तिकिटे मिळवण्यासाठी त्याने बुरखा घातल्याचा संशय लोकांना होता. वीरभद्रय्या याची तपासणी केली असता त्याच्याकडे एका महिलेच्या आधार कार्ड सापडल्याने लोकांना आणखीनच धक्का बसला.


वीरभद्रय्या बुरखा घालून बस स्टँडवर एका बाकावर बसले होते. तेव्हा स्थानिकांनी वीरभद्रय्याचे वर्तन पाहिले. त्यांनी तत्काळ बसस्थानकावर आलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, वीरभद्रय्या हा मूळचा विजयपुरा जिल्ह्यातील गोदागेरी गावचा आहे. तो बेंगळुरूहून ट्रेनने सांशीला आला आणि बस स्टँडवर पोहोचला, तिथे त्याला बुरखा असलेली एक बॅग सापडली. बसस्थानकात भिक्षा मागता यावी म्हणून त्याने बुरखा घातल्याचा दावा वीरभद्रय्याने केला.


"शक्ती योजनेंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवासाचा लाभ घेण्यासाठी त्या पुरुषाने बुरखा घातला होता की नाही हे स्पष्ट नाही. खरं तर, आम्ही झडती घेतली आणि त्याच्याकडे एक आधार कार्ड सापडलं, ज्यामध्ये एका महिलेचा तपशील होता. काही लोकांनी त्याला गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथून येताना पाहिल्याचा दावा केला. समज दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


कर्नाटक सरकारची 'शक्ती' योजना काय आहे?


कर्नाटकमध्ये 11 जून 2023 रोजी शक्ती योजना सुरू करण्यात आली. सरकारच्या मते, ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांना मोफत बससेवा देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. शक्ती योजनेंतर्गत, राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना संपूर्ण कर्नाटकात मोफत बससेवा देण्यात आली आहे. शक्ती योजनेंतर्गत, फक्त कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसेसमध्ये मोफत बस सेवा दिली जाईल. याचा 42 लाखांहून अधिक महिलांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र वीरभद्रय्या याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचे म्हटलं जात आहे.