रामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा
रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
मुंबई : रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. पण रामसेतूनबद्दल अमेरिकेच्या सायन्स चॅनलच्या भूगर्भ वैज्ञानिक आणि पुरातत्व विभागाचा रिपोर्ट समोर आला आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये रामसेतू अस्तित्वात असल्याचे संकेत या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.
भारत आणि श्रीलंकेमध्ये ३० मिल क्षेत्रावर असलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण या दगडांना त्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं वैज्ञानिकांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. हे दगड पाच ते सात हजार वर्ष जुने असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे.
हिंदूंचा धार्मिक ग्रंथ रामायणामध्ये भारताच्या दक्षिणेतलं रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मन्नारद्विपमध्ये दगडांचा सेतू असल्याचा दाखला आहे. समुद्रातल्या या सेतूची खोली ३ फूट ते ३० फुटांपर्यंत आहे. याला भारतामध्ये रामसेतू आणि जगभरात एडम्स ब्रीज नावानं ओळखलं जातं. या सेतूची लांबी जवळपास ४८ किमी आहे.
रामसेतूबाबत वैज्ञानिकांचे ६ खुलासे
१ अमेरिकेच्या सायन्स चॅनलचा दावा- रामसेतू काल्पनिक असू शकत नाही
२ हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीरामांनी असाच सेतू बनवला, वैज्ञानिक ऍलन लेस्टर यांचं वक्तव्य
३ भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या या सेतूचे दगड तब्बल ७ हजार वर्ष जुने, वाळू ४ हजार वर्ष जुनी
४ हा सेतू नैसर्गिक नाही तर माणसांनी बनवला आहे, चॅनलचा दावा
५ रामसेतूवर असलेले दगड खूप वेगळे आणि भरपूर प्राचीन असल्याचा वैज्ञानिकांचा दावा
६ रामसेतूसाठी वापरण्यात आलेले दगड दुसरीकडून आणले असल्याची रिपोर्टमध्ये माहिती
रामसेतूबाबतच्या वैज्ञानिकांच्या खुलाशाचा रिपोर्ट