ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाबाबत हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी अनेक दावे केले आहेत. गुरुवारी विष्णु जैन यांनी एएसआयचा रिपोर्ट सार्वजनिक करत ज्ञानवापीमध्ये पहिले हिंदू मंदिर होते, असा दावा त्यांनी केला होता. जिल्हा वकिलांनी नकल विभाग कार्यालयाने ज्ञानवापी मशिदीचा ASI सर्व्हे रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टच्या एकूण पानांची संख्या 839 असल्याचे सांगण्यात येत असून गुरुवारी विष्णु शंकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानवापी मशिदीचे कोर्टाच्या आदेशाने पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले होते. 18 डिसेंबर रोजी पुरातत्व विभागाने जिल्हा न्यायालयाला अहवाल सोपवला होता. त्यानंतर हिंदू पक्षाने या अहवालाची प्रत दोन्ही पक्षांना सादर करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षकारांना हा अहवाल सोपवण्याचा आदेश दिला होता. 


विष्णु शंकर यांनी केलेल्या दाव्यानुसार, जीपीआर सर्व्हेवर पुरातत्व विभागाने म्हटलं आहे की, या जागेवर पूर्वी एक भव्य हिंदू मंदिर होते. आत्ताच्या वास्तुपूर्वी येथे एक हिंदू मंदिर होते. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार आत्ताची जी वास्तू आहे त्याच्या पश्चिमेकडील भिंती हा हिंदू मंदिराचाच एक भाग आहे. येथे एक प्री एक्झिस्टिंग स्ट्रक्चर (आधीपासून अस्तित्वास असलेले) असून त्यावरच बांधकाम करण्यात आले आहे, असा दावा करण्यात येतोय. 


हिंदू पक्षाने पुढील अहवालाचा हवाला देत पुढे म्हटले आहे की, खांब आणि प्लास्टरमध्ये थोडे बदल करुन मशिदीसाठी त्याचा वापर केला गेला. हिंदू मंदिराच्या खांबांमध्ये थोडेफार बदल करुन नवीन वास्तुसाठी त्याचा उपयोग करण्यात आला. खांबावर असलेले नक्षीकाम मिटवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. येथे सापडलेले 32 शिलालेख असे आहेत जे जुन्या हिंदू मंदिरातील आहेत. देवनागरी ग्रंथतेलगू कन्नडमध्ये शिलालेख सापडले आहेत. 


हिंदू पक्षाच्या वकिलांनी म्हटलं आहे की, महामुक्ती मंडप हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे जो या शिलालेखात सापडला आहे. सर्वेक्षणाच्या दरम्यान एक दगडावर कोरलेला शिलालेख सापडला होता त्याचा एक हिस्सा आधीपासूनच पुरातत्व विभागाकडे होता. मंदिराच्या खांबाचा वापर पुन्हा करण्यात आला आहे. तळघरात हिंदू देवी देवतांची मूर्ती सापडली आहे. या मूर्त्या तळघरात मातीच्या आत दडवून ठेवल्या होत्या. पश्चिमेकडील भिंत हीदेखील हिंदू मंदिराचाच एक हिस्सा आहे हे पूर्णपणे स्पष्ट होतोय. 17व्या शतकात हिंदू मंदिर तोडून आणि विध्वंस केले गेलेल्या मलब्यावरच हा ढाचा बांधण्यात आला आहे. मंदिराचे खांब पुन्हा वापरण्यात आले आहेत.