Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे हिंदू धर्म सेनेने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लव्ह जिहादवर नवा वाद निर्माण करत उजव्या विचारसरणीच्या 'धर्म सेने'ने गुरुवारी मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.


मुस्लिम संघटना ज्या प्रकारे 'लव्ह जिहाद' चालवत आहेत, हिंदूंनी पुढे येऊन आपल्या मुलांना मुस्लिम मुलींशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे धर्म सेनेचे संस्थापक आणि प्रमुख योगेश अग्रवाल यांनी सांगितले. धर्मांतरामुळे हिंदू मुलींची संख्या कमी होत आहे. या पाऊलामुळे मुलींची लोकसंख्या नियंत्रणात राहीलं, असेही ते म्हणाले.


'मुस्लीम मुलीवर प्रेम करणाऱ्या हिंदू तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास, धर्मसेना सर्व व्यवस्था करेल आणि 11 हजार रुपयांचे रोख बक्षीसही देईल, असे अग्रवाल म्हणाले. आता वेळ आली आहे की आम्ही तुमच्या मुलींना वाचवू. तसेच हिंदू कुटुंबात मुस्लिम मुलींचा स्वीकार करा, असे ते पुढे म्हणाले.


धर्म सेना ही जबलपूरमधील जुनी हिंदू संघटना असून 200 हून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत. ही संघटना आधी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत होती, पण नंतर या संस्थेने दोघांशी संबंध तोडले. 


देशभरात 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून मुस्लिम मुलांकडून हिंदू मुलींना फूस लावण्याच्या कथित वाढत्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. सध्या ही रक्कम 11,000 रुपये असेल, मात्र कुठून तरी आर्थिक मदतीची व्यवस्था केल्यास बक्षीस वाढवले ​​जाईल, असे त्यांनी सांगितले.


देशात हिंदू मुलींची लोकसंख्या कमी झाली असून हा उपक्रम सध्या अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अग्रवाल नुकतेच जबलपूरमधील एका हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. संबंधित तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. ही तरुणी 'लव्ह जिहाद'ची शिकार झाली होती, असे त्यांनी सांगितले.