नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे भारतीय जनता पक्षाचे (BJP)वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी (LakKrishna Advani) यांची भेट घेण्यासाठी बुधवारी त्यांच्या घरी पोहोचले. जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये राम मंदिर भूमिपूजनाविषयी चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अडवाणी यांना बोलवलं जावू शकतं. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला साधु संत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास 150 लोकं सहभागी होऊ शकतात.


अयोध्येत राम मंदिरसह रामकथा कुंज पार्क येथे खोदकामात मिळालेल्या अवशेषांचं संग्रहालय आणि शेषावतार मंदिर देखील बनवलं जाणार असल्याची माहिती झी मीडियाकडे आहे.


राम मंदिरचा पाया हा 15 फूटांचा असेल. ज्यामध्ये लोखंडाचा वापर नाही होणार. फक्त काँक्रीट आणि मोरंगपासून ते तयार करण्यात येणार आहे. हे संपूर्ण मंदिर 10 एकर जागेत बनणार आहे. एतर 57 एकर जमीन ही राम मंदिर परिसरासाठी वापरण्यात येईल. मंदिर परिसरात नक्षत्र वाटिका बनवली जाणार आहे. या नक्षत्र वाटिकामध्ये 27 नक्षत्राची झाडे लावण्यात येणार आहेत.