मुंबई : होळी (Holi 2022) भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उत्तर भारतात खास करुन या सणाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी देखील आनंदाने सहभागी होतात. पण यंदाच्या होळी आधी सर्वसामान्यांना 5 मोठे झटके लागणार आहेत. ज्यामुळे होळीचा रंग कुठेतरी फिका होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. EPF वरील व्याजदरात घट : 12 मार्च रोजी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफ खात्यावरील व्याजदर 8.1 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका 6 कोटी पीएफ धारकांना बसणार आहे. अर्थ मंत्रालयाने अजून याला मंजुरी दिलेली नाही. याआधी 8.5 टक्के व्याजदर दिला जात होता.


2. दूधाच्या दरात वाढ : या महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ झाली. Amul नंतर Parag आणि Mother Dairy ने दुधाच्या दरात वाढ केली. लीटर मागे 2 रुपये वाढवण्यात आले आहेत. ज्याचा सरळ फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.


3. महागाई दर : सरकारने सोमवारी फेब्रुवारी महिन्याचा महागाई दर घोषित केला. मागच्या महिन्याच्या तुलनेत महागाई दर 13.11 टक्क्यावर पोहोचला आहे.


4. सीएनजीच्या किंमती वाढल्या : उत्तर प्रदेश सह 5 राज्यातील निवडणुकानंतर अनेक मोठ्या शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत CNG 57.51 रुपये प्रति किलो झाली आहे.


5. कमर्शिअल एलपीजी महागला : ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल एलपीजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा महिन्याच्या सुरुवातीलाच केलीये. ज्यामध्ये तब्बल 105 रुपयांची वाढ झाली आहे.