मुंबई : अवघ्या 11 दिवसांवर 2020 हे वर्ष येवून ठेपलं आहे. 2019 हे वर्ष आपला निरोप घेण्यासाठी सज्ज आहे. असं असताना सगळ्यांना नवीन वर्ष 2020 हे खुणावत आहे. 2020 वर्ष हे ट्रॅव्हल प्रेमींसाठी खास आहे. सगळीकडे 2019 या वर्षाला निरोप देण्याची धावपळ असताना 2020 च्या आगमनाची तयारी देखील सुरू झाली आहे. 


जानेवारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 वर्षातील जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुट्या मिळणार आहेत. 1 जानेवारी हे बुधवारी आहे. तर 2 जानेवारीला गुरूवारी गुरू गोविंद सिंह जयंती आहे.  बुधवार आणि गुरूवार सुट्टी मिळाली तर तुम्ही शुक्रवारी एक दिवस खाडा करून पुन्हा शनिवार-रविवार जोडून 5 दिवस सुट्टी घेऊ शकता. मकर संक्रात 14 जानेवारीला असून पोंगल 15 जानेवारीला आहे. त्यामुळे या दोन दिवशी देखील तुम्हाला सुट्टी मिळू शकते. मात्र या महिन्यातील एक सुट्टी मिळणार नाही. जानेवारी महिन्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन रविवारी येत असल्याने ती सुट्टी जाणार आहे. 


फेब्रुवारी 


19 फेब्रुवारी रोजी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानंतर गुरूवारचा एक दिवस. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री जयंती आहे. अनेक राज्यात महाशिवरात्रीची सुट्टी असते. पुन्हा शनिवार आणि रविवारी सुट्टी घेऊन तुम्ही तीन दिवसांचा छोटा हॉलिडे प्लान करू शकता. 


मार्च 


या महिन्यात दोन सुट्ट्या आहेत. होळी 10 मार्चरोजी मंगळवारी आहे तर 25 मार्च रोजी बुधवारी गुढी पाडवा आहे. या दोन सुट्ट्या मार्च महिन्यात मिळू शकतात. या महिन्यात जोडून कमी सुट्ट्या आहेत. 


एप्रिल 


2020 मधील एप्रिल महिना थोडा खास आहे. या महिन्यात तुम्ही अनेक प्लान्स करू शकता. 2 एप्रिल गुरूवारी राम नवमी आहे. एक दिवस शुक्रवारी सुट्टी घेऊन लाँग विकेंड सेलिब्रेट करू शकता. 6 एप्रिल मंगळवारी महावीर जयंती आहे. मधला दिवस असल्यामुळे एक घरच्या घरी आराम होऊ शकतो. त्यानंतर 10एप्रिलला शुक्रवारी गुडफ्रायडे आहे. या नंतर शनिवार,रविवार सुट्टी घेऊन तुम्ही विकेंड सेलिब्रेट करू शकता. त्यानंतर 12 तारखेला रविवारी इस्टर तर 13 तारखेला सोमवारी बैसाखी आहे.


मे


2020 मध्ये 1 मे शुक्रवारी आला असल्याने ही कामगार दिनाची सुट्टी घेत तुम्ही 3 दिवसांचा प्लॅन करू शकता. पण मोठा प्लॅन करायचा असेल तर 7 मे गुरूवारी बुद्ध पौर्णिमा आहे. तेव्हा देखील तुम्ही मोठा प्लान करू शकता. पुन्हा 25 मे म्हणजेच सोमवारी ईद-उल-फितर आहे. 


जून आणि जुलै महिना पावसाचा असला तरीही हे दिवस ऑफिस आणि घर असेच जाणार आहेत. 


ऑगस्ट


ऑगस्ट महिना सुट्ट्यांसाठी खास ठरू शकतो कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी बकरी ईद आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी, 13 तारखेला रक्षाबंधन आणि स्वतंत्र्य दिन 15 ऑगस्ट अशा ३ सुट्ट्या लागून असतील. पुन्हा 22 ऑगस्ट रोजी विनायक चतुर्थी आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मोहरम आहे. तसेच 31 ऑगस्टला ओणम आहे. त्यामुळे ऑगस्ट हा महिना खास आहे. 


ऑक्टोबर


या महिन्याची सुरुवात गांधी जयंतीपासून होते कारण 2 ऑक्टोबर रोजी शुक्रवार असल्याने तुम्ही 3 दिवसांचा प्लॅन ऑक्टोबरमध्ये सुद्धा करू शकता. तसेच 25 ऑक्टोबरला रविवारी दसरा आहे. आणि 29 ऑक्टोबरला गुरूवारी ईद-ए-मिलाद आहे. 


नोव्हेंबर


हा महिना नेहमीच दिवाळीमुळे खास ठरतो. 14 नोव्हेंबर रोजी शनिवारी दिवाळी असून 15ला जोडून सुट्टी घेऊ शकता. तसेच 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी सुट्टी घेऊन तुम्ही 3 दिवसांचे प्लॅन करता येऊ शकतो कारण 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीची सुट्टी असणार आहे.


डिसेंबर


 डिसेंबर महिनाच खास असतो. वर्ष सरताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हा महिना खास असतो. या महिन्यात नाताळची सुट्टी आली आहे शुक्रवारी. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जोडून घेतल्यास तुमची तीन दिवसांची सुट्टी होऊ शकते.