सुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...
...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे
नेहा सिंह, झी मीडिया, मुंबई : ड्रायव्हिंगची आव़ड असेल, आपल्या मर्जीने फिरायचं असेल, सुट्टी एन्जॉ़य करायची असेल तर आता सेल्फ ड्राईव्ह पॅकेजची सुविधा टूर ऑपरेटर्स देत आहेत. तुमच्या आवडीची बाईक किंवा कार तुम्हाला मिळू शकेल. देशातल्या ठिकाणांसह परदेशातल्या पर्यटनस्थळीही तुम्ही ही सुविधा मिळवू शकाल. मुंबईहून कोकणात जायचं असेल तर हरिहरेश्वर-तारकर्लीमार्गे गोवाचा प्लॅन बनवू शकाल. आगरा- लखनऊ- वाराणसी, मथुरा असं १२ दिवसांचं पॅकेज ५० हजार रूपयांत मिळेल. जयपूर- अजमेर, जोधपूर, जैसलमेर, माऊंटअबू, उदयपूरचं १३ दिवसांचं पॅकेज ४८ हजारांत मिळेल. चंडीगढ, मनाली, लेह, श्रीनगर, पटणी टॉप, अमृतसहचं २२ दिवसांचं पॅकेज ९१ हजारांत मिळेल.
दक्षिण भारतातही ही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बंगळुरू, महाबलीपूरम, पॉण्डीचेरीचं ८ दिवसांचं पॅकेज ३३ हजारात उपलब्ध आहे. चेन्नई, कांचीपूरम, महाबलीपूरमचं ३ दिवसांचं पॅकेज ८ हजार रूपयात उपलब्ध आहे. सेल्फ ड्राईव्हची इंटरनॅशनल पॅकेजेसही उपलब्ध आहेत. युके, लंडन, एडीनबर्ग, फोर्टविल्यम्स, ग्लास्गो फिरून पुन्हा लंडन असं १९ दिवसांचं पॅकेज ५ लाख रूपयांना उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी- जिप्सी पॉईंट, मेलबर्नसह इतर डेस्टीनेशन कव्हर करत १३ दिवसांचं पॅकेज दीड लाखात उपलब्ध आहे. न्यूझीलंडमध्येही ऑकलंड, ख्राईस्टचर्चसह इतर काही ठिकाणं कव्हर केल्यास १३ दिवसांचं पॅकेज सव्वा लाखात उपलब्ध आहे.
टूर पॅकेजमध्ये कार, हॉटेल, एंट्री फी, जेवण आणि ट्रीप इंश्युरन्स यांचा समावेश असेल. इंधनाचा खर्च मात्र ग्राहकांना उचलावा लागेल. देशांतर्गत पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणारी ही पॅकेजेस अनोखी ठरणारी आहे.