मुंबई : सोशल मीडियाचा वापर वाढत चालल्यामुळं हल्ली फिरायला कुठे जायचं हा प्रश्न कमीच विचारला जातो कारण, या प्रश्नानं डोक्यात घर करताच त्याची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीनं मिळून जातात. ही उत्तर देणारं व्यासपीठ असतं, सोशल मीडिया. हल्लीच्या तरुणाईचा फिरण्याकडे वाढणारा कल पाहता, काहीतरी वेगळं, offbeat पाहण्यालाच प्राधान्य असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात तुम्ही असाल, तर एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी तयार आहे. हा पर्याय म्हणजे एक अविश्वसनीय ठिकाण. डोंगरदऱ्यांमध्ये दडलेल्या या ठिकाणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 


आता तुम्ही म्हणाल हे ठिकाण नेमकं कुठंय? तर हे ठिकाण अगदीच लांब किंवा न पोहोचण्याइतकंही दूर नाही. वर्षातून एकदा तुम्ही जर कोणत्या निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ इच्छिता, तर हे ठिकाण निवडू शकता. 


हा नैसर्गिक स्विमिंग पूल असणारं हे ठिकाण आहे, उत्तराखंडमधील धारचूला गावात. जंगलातून येणाऱ्या थंडगार, स्वच्छ पाण्याचे झरे या तलाववजा नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये एकत्र येतात. 


इथं पोहण्याचा अनुभव घेऊन तुम्ही आयुष्यभरासाठीच्या आठवणी साठवून ठेवू शकता. एखाद्या लक्झरी हॉटेलमध्येही मिळणार नाही, अशीच अनुभूती इथं आल्यावर तुम्हाला मिळेल. 


हे ठिकाण आहे, उत्तराखंडमधील धारचुला गावात. आधुनिकीकरणापासून, प्रदूषणापासून मैलोन मैल दूर असणाऱ्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेलंत तरी, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. (holidays uttarakhand hidden natural pool is so instagram perfect see photos )


व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनीही या ठिकाणाविषयी ट्विट करत,  'माझ्या फिरस्तीच्या यादीमध्ये या ठिकाणाचं नाव आलंच पाहिजे. असं काही मी यापूर्वी पाहिलंच नाहीये, मला याचं जीपीएस लोकेशन पाठवा', असं ट्विट त्यांनी केलं होतं. 



कसं पोहोचावं या ठिकाणी ? 
या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उत्तराखंडमधील धारचूला येथे जावं लागणार आहे. तिथून 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तवाघाट इथं पोहोचावं लागणार आहे. धारचूला ते तवाघाट पोहोचल्यानंतक काहीचा चढ तुम्हाला ओलांडावा लागणार आहे. तवाघाटपासून या नैसर्गिक जलस्त्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण दीड तासांचा वेळ लागेल.