मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतो. काही जण घर खरेदीसाठी पैशाची जमवाजमव करत आहेत, तर काही जण नवीन घर खरेदीसाठी शोधतायत. अशा इच्छुकांसाठी ही बातमी महत्वाची असणार आहे. कारण या बातमीवरून तुमचं घर घेण्याचं स्वप्न पुर्ण होणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या शहरात घरांचे दर वाढणार आहेत ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या किमतीत बंपर वाढ झाली आहे. 42 शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचवेळी, 5 शहरांमध्ये घरांच्या किमतीत घट झाली आहे.तर 3 शहरांमध्ये किमती स्थिर आहेत. याबाबतची माहिती नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) घरांच्या किंमती निर्देशांकावरून प्राप्त झाली आहे.


घरांचे दर किती वाढलेत?
नॅशनल हाऊसिंग बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 प्रमुख महानगरांमध्ये वार्षिक आधारावर निर्देशांकात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद (13.5 टक्के), बेंगळुरू (3.4 टक्के), चेन्नई (12.5 टक्के), दिल्ली (7.5 टक्के), हैदराबाद (11.5 टक्के), कोलकाता (6.1 टक्के), मुंबई (2.9 टक्के) आणि पुणे (3.6 टक्के) झाले आहे. विशेष म्हणजे, 50 शहरांचा निर्देशांक तिमाही आधारावर 1.7 टक्क्यांनी वाढला आहे, तर गेल्या तिमाहीत 2.6 टक्क्यांनी वाढला होता.


नवी मुंबईकरांना दिलासा
घरांच्या किंमत निर्देशांकात (HPI) वार्षिक आधारावर मोठा फरक होता. कोईम्बतूरमध्ये, जिथे ते 16.1 टक्क्यांनी वाढले. त्याचवेळी नवी मुंबईत 5.1 टक्क्यांनी घट झाली आहे. HPI मध्ये, 2017-18 हे आधार वर्ष म्हणून घेतले जाते. हे तिमाही आधारावर 50 शहरांमधील मालमत्तेच्या किमतींच्या हालचालींचा मागोवा घेते.


दरम्यान आता नॅशनल हाऊसिंग बँकेच्या घरांच्या किंमतीनुसार तुम्हाला तुमच्या शहरातील घरांचे दर कळाले असून,याद्वारे आता तुम्हाला तुमच्या शहरात घर खरेदी करता येणार आहेत.