Home Loan EMI 5 हजारांपर्यंत होऊ शकतं कमी, जाणून घ्या या मागील गणित
अनेक बँका होम लोनवर जबरदस्त ऑफर्स आणि सवलतीही देत आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही यामध्ये सवलत मिळवू शकता.
मुंबई : अनेकांचं हे स्वप्न असतं की, आपलं स्वत:चं घर असावं, ज्यासाठी ते खूप धडपड करतात आणि लोनवरती आपलं घर घेतात. परंतु या होम लोनवर लागणारं EMI मुळे लोकं फारच त्रस्त असतात. ज्यामुळे बऱ्याचदा लोकांना पश्चतावा देखील होतो. परंतु आज आम्ही तुमच्या EMI चं ओझे कमी करण्यासाठी एक उत्तम युक्ती सांगणार आहोत. ज्यामुळे जास्तीत जास्त 5 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला EMI मध्ये सुट मिळू शकते.
सुरुवातीला बहुतांश बँका 8-9 टक्के दराने गृहकर्ज देतात, मात्र आता बहुतांश बँका ७ टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. यासोबतच अनेक बँका होम लोनवर जबरदस्त ऑफर्स आणि सवलतीही देत आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही यामध्ये सवलत मिळवू शकता.
EMI 5 हजारांनी कमी होईल
जर तुम्हीही गृहकर्ज घेतले असेल आणि EMI मुळे त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा EMI जवळपास 5 हजारने कमी करण्यास मदत मिळेल. जर तुम्ही तुमचे जुने गृहकर्ज दुसऱ्या बँकेत शिफ्ट केले, तर तुमचा EMI भार कमी होऊ शकतो. पण त्यासाठीही आधी तुम्हाला नियोजन करावे लागेल.
जाणून घ्या EMI मध्ये किती फरक पडेल
बँक लोन ट्रान्सफर केल्याने तुमच्या EMI वर किती फरक पडेल ते उदाहरणाने समजून घ्या. म्हणजे तुम्हाला नक्की काय करावं लागेल याचा अंदाजा येईल.
समजा तुम्ही आजपासून 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये गृहकर्ज घेतले असेल, तर त्या बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर 9.25 टक्के होता. आता तुम्ही गृहकर्ज नवीन बँकेत शिफ्ट करून ते ७ टक्के दराने घेतला तर तुमच्या EMI मध्ये किती फरक पडेल ते समजून घ्या...
होम लोन शिफ्ट केल्याने EMI वरील फरक
सध्याची बँक
वर्ष 2017
लोन रक्कम 30 लाख
व्याज दर 9.25%
लोन कालावधी 20 वर्षे
EMI 27 हजार 476
आता समजा की 2022 मध्ये तुम्ही तुमचे गृहकर्ज नवीन बँकेत शिफ्ट केले. तर त्यामुळे तुमचं आता थकीत कर्ज 26 लाख रुपये आहे. हे कसं शक्य आहे? जाणून घ्या गणित
नवीन बँक ईएमआय गणना
वर्ष 2020
लोन रक्कम 26 लाख
व्याज दर 6.90%
लोन कालावधी 16 साल
EMI 22 हजार 400
म्हणजेच, जर तुम्ही तुमचे गृहकर्ज अशा प्रकारे शिफ्ट केले, तर तुमचा ईएमआय सुमारे 5 हजार रुपयांनी कमी होईल. आता जाणून घेऊया की व्याज भरण्यात तुम्हाला कसा फायदा होईल?
16 वर्षांच्या कालावधीत नवीन बँकेकडून गृहकर्जावर एकूण व्याज भरल्यास = रु. 17,00,820
जुन्या बँकेकडून 16 वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जावर दिलेले एकूण व्याज = रु 23,90,488
व्याजात अंदाजे बचत = 23,90,488 - 17,00,820 = 6.89 लाख
याचा अर्थ की, उर्वरित कर्ज तुम्ही शिफ्ट केला तर, तुम्ही 6.9 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात.