Home Loan Closure Tips: सध्याच्या काळात आपल्या स्वप्नाचं घर घेणं स्वप्नवत आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमती पाहता पगारदार व्यक्तीला घर घेणं कठीण आहे. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक किंवा कोणत्याही वित्तीय कंपन्याकडे अर्ज करून गृहकर्ज घेतो. यानंतर वर्षानुवर्षे मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतो. परंतु गृहकर्जाचा ईएमआय संपल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळ कागदपत्रे


गृहकर्ज घेताना तुम्ही ज्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे बँकेत गहाण ठेवलेली असतात. त्यामुळे कर्ज उतरताच बँकेकडून कागदपत्रं घ्या. अलॉटमेंट लेटर, पजेशन लेटर, लीगल डॉक्युमेंट सेल डीड, बिल्डर-बायर अग्रीमेंट, सेल अग्रीमेंट आणि इतर कागदपत्रे समाविष्ट असू शकतात.


नो ड्यूज सर्टिफिकेट


जेव्हा तुमच्या डोक्यावरील कर्ज संपतं, तेव्हा तुम्हाला बँक किंवा वित्तीय कंपनीकडून नो ड्यूज सर्टिफिकेट दिले जाते. कोणत्याही परिस्थितीत हे प्रमाणपत्र बँकेकडून घ्या. तुम्ही बँकेतून घेतलेली रक्कम पूर्णपणे परत केल्याचा हा पुरावा आहे. म्हणजेच मालमत्तेवर इतर कोणाचाही हक्क राहात नाही. 


Lien  काढल्याची खात्री करा


जेव्हा गृहकर्ज दिले जाते, तेव्हा बँक किंवा इतर कर्ज देणारी संस्था त्यात काही वेळा धारणाधिकार (Lien ) जोडते. म्हणजे तुमच्या मालमत्तेवरचा अधिकार सांगितला जातो. कर्ज पूर्ण झाल्यानंतर बँकेने धारणाधिकार काढला की नाही हे निश्चितपणे तपासा. धारणाधिकार काढून टाकल्यानंतर, तुम्ही तुमच्या मालमत्तेचे पूर्ण हक्कदार बनता.


Knowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण


नॉन-एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट


नॉन-एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. याचा अर्थ मालमत्तेवर कोणतेही नोंदणीकृत भार नाही. कर्जाची परतफेड केल्यानंतर, सर्व परतफेडीचे तपशील भार प्रमाणपत्रात दिसतात. तुम्ही तुमची मालमत्ता विकायला गेलात तर खरेदीदार तुमच्याकडून बोजा प्रमाणपत्र मागतो.


क्रेडिट स्कोअर


तुम्ही कर्ज पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमचे क्रेडिट प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे. जर हे त्यावेळी झाले नसेल, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवा आणि ते लवकरात लवकर अपडेट करा.