नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये महागाई दरमधून दिलासा मिळाल्यानंतर लवकरत रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमचं होम लोन कमी करण्याचा दिशेने पाऊल उचलण्याचा निर्णय़ घेऊ शकते. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर कमी करु शकते. हा लागोपाठ पाचवा महिना आहे ज्यामध्ये महागाई दर आरबीआयच्या अनुमानानुसार ४ टक्क्यापेक्षा कमी राहिला आहे. 


व्याजदर कमी करण्याची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फिक्की, एसोचेम, CII च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला उदय कोटक, आदी गोदरेज, बीके गोयंका, चंद्रजीत बॅनर्जी सारखे दिग्गज व्यक्त उपस्थित होते. इंडस्ट्रीच्या या दिग्गज लोकांनी म्हटलं की, व्याज दरांमध्ये लवकरात लवकर २५ बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25% टक्के दर कमी करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक ३ महिन्याला इंडस्ट्री आपलं इनपुट रिजर्व बँकेला देणार आहे.


या दरम्यान रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक्सपोर्टर्स आणि एमएसएमई सेक्टरमधील अडचणी दूर करण्यासाठी सल्ले देखील मागवले. इंडस्ट्रीने बाजारात लिक्विडिटी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी देखील आरबीआयकडे विनंती केली आहे. फिक्कीचे अध्यक्ष संदीप सोमानी यांनी झी मीडियाशी बोलताना म्हटलं की, गव्हर्नर यांनी विश्वास दिला आहे की, लिक्विडिटी वाढवण्यासाठी रिजर्व्ह बँक सर्व प्रकारचे पाऊलं उचलत आहे.


आता किती आहेत व्याजदर?


भारतीय रिजर्व्ह बँकेने डिसेंबरमध्ये झालेलया मॉनिटरिंग पॉलिसीच्या बैठकीत रेपोदरमध्ये कोणताही बदल केला नव्हता. रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवलं.