मुंबई : स्वतःचं घर असणं ही आयुष्यातील एक सुंदर गोष्ट असते. अनेकजण घरभाडे भरण्यापेक्षा आपले स्वतःचे घर असावे  यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ते काही डाऊनपेमेंट जमवतात आणि गृहकर्ज घेतात. काही रिअल इस्टेट कंपन्या गृहकर्ज सल्लागार सुद्धा आपल्या ग्राहकांना देतात. परंतु, गृहकर्जाच्या व्याजाचा अंदाज न घेता, कर्ज घेतल्यास त्याचा आपल्या उर्वरित दैनंदिन खर्चावर भार पडू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरमालकाला दरमहा भाडे देण्यापेक्षा, घर खरेदी करून त्यासाठी गृहकर्ज घेणे आणि त्याचे हफ्ते बँकेला देणे ही बहुतांश मध्यमवर्गीय कुटूंबात वापरली जाणारी पद्धत आहे. परंतु त्यासाठी जेवढा जास्त कालावधी दिला तेवढे जास्त व्याज बँकेला देणे क्रमप्राप्त ठरते. 


उदाहरणार्थ, जर तुम्ही 40 लाखाचे कर्ज 20 वर्षासाठी 8.5 टक्क्यांच्या व्याजदराने घेतले असेल. तर त्यासाठी तुम्हाला 34 लाखापर्यंत व्याज भरावे लागेल. म्हणजेच असे एकूण जवळपास 81 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. 


त्याकरीता तुम्ही तुमचे व्याज कमी करण्यासाठी काय करू शकता, ते वाचा


1. आधीच कर्जाची फेड करणे
कर्ज घेतल्यानंतर तुमचे व्याज कमी करण्यासाठी तसेच पैशांची बचत करण्यासाठी कर्जाचा हफ्ता वेळेआधी भरा. तुमच्या कर्जाच्या हफ्त्या भरण्यात शिस्त असली तर व्याजाची रक्कम कमी होऊ शकते. कर्ज फेडण्याच्या एकूण कालावधीपेक्षा आधी फेडल्याने व्याजाची रक्कम कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, 40 लाखाचे कर्ज 20 वर्षाऐवजी 15 वर्षात भरल्यास 5 लाखांची बचत होऊ शकते.


2. कमी व्याजदर असलेल्या संस्था निवडा
गृहकर्ज घेण्याआधी कोणती बँक कोणती संस्था आपल्याला कमी कर्ज देते, याचा तपास करणे महत्वाचे आहे. तुम्ही एखाद्या बँकेचे किंवा वित्तसंस्थेचे जुने तसेच loyal ग्राहक असाल तर, ती बँक किंवा संस्था तुमचे व्याजदर कमी करू शकते.


3. गुंतवणूक करा
गृहकर्ज घेण्याआधी तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर, डाऊनपेमेंट करतेवेळी त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे गृहकर्जाआधी तुमची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरेल.


4. कर्ज ट्रान्सफर करणे
आपण घेतलेल्या संस्थेच्या गृहकर्जाच्या व्याजाचे गणित करीत रहा. गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्हाला इतर चांगल्या संस्थेमध्ये कमी व्याज मिळत असल्यास आणि दस्ताऐवजांसाठी जास्त खर्च येणार नसल्यास, गृहकर्ज ट्रान्सफर करणे योग्य ठरते. त्यामुळे तुमच्या व्याजासाठी होणारा खर्च कमी होईल. तोच पैसा बचतीसाठी वापरता येईल.