Home Loan: आता घर घेणं सोपं; SBIपेक्षा ही कमी दरात होम लोन देतोय, या बँकेचा दावा
तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर अजीबात उशीर करु नका. मात्र कोणताही छुपा व्याज दर नाही ना, याची स्वत: खात्री करा.
मुंबई : प्रत्येकाला आपलं स्वत:च घर असावं अस वाटतं, पण अनेकदा जास्त व्याज दरामुळे सर्वसामान्य लोकांच हे स्वप्न स्वप्नच रहातं. पण आता तुम्ही स्वत:चं घर घेऊ शकता. कारण आता होम लोन इंटरेस्ट कमी झाला आहे.
Kotak Mahindra बॅंकेने सर्वसामान्य लोकांचा विचार करत नवीन ऑफर बाजारात आणली आहे. यामध्ये Kotak Mahindra बँकेने होम लोनचा (Home loan) सुरुवातीचा व्याजदर 6.65% इतका ठेवला आहे. तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर अजीबात उशीर करु नका. मात्र कोणताही छुपा व्याज दर नाही ना, याची स्वत: खात्री करा.
कोटक महिंद्रा बॅंकेची स्पेशल ऑफर
कोटक महिंद्र बँकेच्या या विशेष ऑफरमध्ये निश्चित केलेल्या अटींवर, स्टेट बँकेपेक्षा ही कमी व्याजदराने गृहकर्ज (Home loan) दिले जात आहे. कोटक महिंद्रा बँकेचा दावा आहे की, इतर कोणतीही बँक सध्यातरी स्वस्त गृहकर्ज देत नाही. या ऑफरची शेवटची तारीख 31 मार्च आहे. यामध्ये तुम्ही 6.65% दराने गृहकर्जासाठी अर्ज करु शकता.
ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर किंवा सीआयबीआयएल (CIBIL)चांगले असेल अशा ग्राहकांना 6.65% दराने गृहकर्ज दिले जाईल, असे कोटक महिंद्र बँकेने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, बँक एकूण मासिक उत्पन्नाचे प्रमाण पाहूण (Loan to Value)कर्जाचे मूल्यांकन करेल. पूर्ण पडताळणी केल्यानंतर तुम्हाला अतिशय कमी व्याजदराने कर्ज दिले जाईल.
गृहकर्जावर SBI ने ही कमी केले व्याज दर
देशातली सगळ्यात मोठी बॅंक SBI ने ही आता गृहकर्जावर व्याज दर कमी केले आहेत. SBI ने कमीत कमी व्याज दर 6.70% ठेवली आहे. ज्यामध्ये तुम्ही 75 लाखापर्यंत होम लोन घेऊ शकता.
स्टेट बँकेने नुकताच रिअल इस्टेट ग्रुप शापूरजी पालनजी (Shapoorji Pallonji) यांच्याशी करार केला आहे. शापूरजी पालनजी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनाही या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
घर बसल्या माहिती मिळवण्यासाठी 72089-33140 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता, असे स्टेट बँकेने म्हंटले आहे. स्टेट बँक गृहकर्ज क्षेत्रात कार्यरत आहे. एकूण ३४ टक्के लोकांनी स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. स्टेट बँकेने डिसेंबर 2020 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख लोकांना गृहकर्ज दिले आहे.