गृहमंत्री अमित शाहंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; लॉकडाऊन ५ लागू होणार?
गृहमंत्र्यांनी घेतला लॉकडाऊन बाबत आढावा
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. लॉकडाऊन ४ बाबत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन बाबतचं मत जाणून घेतलं. देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या सरकारपुढे आव्हान म्हणून उभं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लॉकडाऊनमुळे यश आलं आहे. पण अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.
लॉकडाऊन ४ संपल्यानंतर राज्य पुढे काय करणार आहेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. ३१ मे नंतर लॉकडाऊन ५ लागू होईल का याबाबत देशातील लोकांच्या मनात प्रश्न आहे.
जून महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दुसरीकडे मजुरांचं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलातंर सुरु आहे. इतर देशांतून देखील लोकांना भारतात आणून क्वारंटाईन केलं जात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मजुरांमध्ये देखील कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने राज्यांपुढील आव्हान वाढणार आहे.