मुंबई : राजस्थानमधील राजकारण पेटलंय यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्रालयामे फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे प्रमुख सचिवांकडून रिपोर्ट मागितले आहेत. सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, राजस्थानचे प्रमुख सचिव यांच्याकडून रिपोर्ट मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाने याला प्रायवसीचे उल्लंघन म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रालयाने कथित रुपात व्हायरल होत असलेल्या फोन कॉल ऑडिओची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणावर गृहमंत्रालयाच्या करडी नजर आहे. या प्रकरणाची राजस्तान पोलीस कसून चौकशी करत आहे. 


काँग्रेसने असा आरोप केला आहे की, ऑडिओ राजस्तानमध्ये गहलोत सरकारला पाजण्यासाठी संजय जैनसोबत भंवर लाल शर्माचा यामध्ये आवाज आहे. यामध्ये ३० आमदारांवर भंवर लाल शर्मा आणि संजय जैन यांच्यात चर्चा होत आहे. या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसओजीची टीम मानेसरमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली. मात्र  तेथे भंवरलाल शर्मा सापडले नाहीत.


ज्या टेपच्या पुराव्यानुसार काँग्रेस भाजपचा खरा चेहरा समोर आणण्याचा दावा करत आहेत. त्यावरच भाजपने आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप प्रवक्ता संबित पात्राने म्हटलं की, राजस्थान सरकार सगळ्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करत आहे. कोरोनाच्या काळात जिथो लोकं व्हेंटिलेटरकरता हैराण झाले आहे तेथे काँग्रेस आमदार स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत आहेत.