नवी दिल्ली :  नवी दिल्लीतून हनी ट्रॅपची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करत फ्लॅटवर बोलावण्याचे आमीष दाखवायची. पीडित जाळ्यात फसल्याचे पाहून नंतर त्याला लुबाडण्यासाठी मोठा सापळा रचायची. या ट्रॅपमध्ये आतापर्यंत अनेक जण अडकले आहेत, मात्र बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण तक्रार करण्यास समोर येत नाही आहेत.मात्र आता या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनी ट्रॅप करणारी ही टोळी सोशल मीडियावर व्यावसायिकांना प्रामुख्याने टार्गेट करायची. व्यावसायिकांनी हनीप्रित नामक तरूणी फेसबूक रिक्वेस्ट टाकून त्यांच्याशी थेट व्हिडिओ क़ॉलवर बोलायची. या क़ॉलमध्ये ती आपल्या सुंदरतेने समोरच्या व्यक्तीला घायाळ करत त्यांना फ्लॅटवर बोलवायची. 


नकली पोलिसांचा छापा 
पीडित आपल्या जाळयात फसल्याचे कळताच त्याच्यासाठी एक वेगळा ट्रॅप रचायची. पीडित आपल्या घरी येताच नकली पोलिसांना धाड टाकायला सांगायची. त्यानुसार पीडित व्यक्ती तरूणीच्या घरी पोहोचताच नकली पोलीस बनून धाड टाकायचे. पोलिसांची ही धाड पाहून तरूणी पीडित व्यावसायिकाला पैसे देऊन प्रकरण मिटवण्यास भाग पाडायची. त्यानुसार लाख-दोन लाखात सौदा ठरवत प्रकरण मिटवण्यात यायचं, अशाप्रकारे हा ट्रॅप रचला जायचा. 


असाच एक ट्रॅप रचताना एका व्यावसायिकाला हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेल करून दीड लाख रुपये उकळल्याची घटना घडली होती. या घटनेत पीडित व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.या तक्रारीनंतर आता या टोळीचा तपास सुरु झाला. 


विशेष पथक तैनात 
दरम्यान या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमले होते. या पथकाने खबरींना कामाला लावून घटनेचा तपास सुरु केला. या तपासात टोळी ज्या ठिकाणावर या फसवणूकीच्या घटना करायची त्या फ्लॅटचा पत्ता शोधून छापा टाकला. मात्र आरोपींना आधीच या घटनेची माहिती मिळाल्याने ते फरार झाले होते. पोलिसांनी यानंतर फ्लॅटच्या मालकाची चौकशी केली. 


या चौकशीत पवन या संशयित आरोपीची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी दिल्लीतील पश्चिम विहार येथील ज्वाला-हेडी मार्केटच्या फायर स्टेशनजवळून पवन उर्फ ​​घनश्याम, मनजीत आणि दीपक या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी नंतर टोळीच्या इतर सदस्यांची माहिती दिली. पोलिसांनी त्यानुसार इतर आरोपींना ताब्यात घेत घटनेचा पर्दाफाश केला आहे.