नवी दिल्ली : साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम 20 वर्षासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक माहिती हळूहळू अघडकीस येत आहे. राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत मिळू शकलेली नाही पण तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


राम रहिमचे कारनामे बाहेर आल्यानंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने (आयएफटीडीए) बाबा आणि हनीप्रीत यांचे सदस्यत्व रद्द केले. या संपूर्ण प्रक्रियेत, प्रसारमाध्यमांमध्ये ते प्रमाणपत्र आले जे राम रहिम आणि हनीप्रीत दिले गेले होते. हनीप्रीतचा मोबाइल नंबर 86**77 याच फॉर्मवर लिहिला होता. सोशल मीडियावर हा नंबर आता व्हायरल होत आहे.