#JusticeForNagaraju : आपल्या देशात आजही जात-पात, धर्म याचा पगडा लोकांच्या मनावर किती घट्ट बसलाय आहे याचं एक भीषण उदाहरण समोर आलं आहे. केवळ दुसऱ्या धर्मातल्या मुलाशी लग्न केलं, या कारणामुळे एका तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 वर्षांचा नागराजू (Nagraju) हा हैदराबादमधल्या (Hyderabad) बिल्लापुरम इथं राहत होता. त्याचं 23 वर्षीय सय्यद सुलतानासोबत (Syed Sultanan) लग्न झालं. लग्नाच्या दोन महिन्यातच नागराजूची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण ऑनर किलिंगचे (honor killing) असल्याचं सांगितलं जात आहे.


तरुणीच्या कुटुंबीयांनीच नागराजूची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण मुलीच्या कुटुंबातील आहेत. घटनास्थळी उपस्थित अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि काहींनी फोटो काढले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


बुधवार, 4 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सरूरनगर तहसीलदार कार्यालयाजवळ थरारक घटना घडली. नागराजू आपली पत्नी सुलतानासह मोटरसायकलवरुन जात होता. त्याचवेळ सुलतानाच्या कुटुंबातील काही लोकांनी त्यांना रस्त्यात अडवल आणि नागराजूवर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नागराजूचा जागीच मृत्यू झाला. 


या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. नागराजूच्या हत्येत त्याच्या पत्नीच्या हात असल्याचा आरोप करत नागराजूच्या कुटुंबीयांनी आंदोलन केलं. नागराजूने 31 जानेवारी रोजी सुलतानाशी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. मुलगा वेगळ्या धर्माचा असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी नागराजूची हत्या केल्याचा आरोप नागराजूच्या कुटुंबियांनी केला आहे. 


घटनेनंतर भाजप आक्रमक
भाजपने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत रॅली काढली. गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ही घटना गंभीर असल्याचं ट्विट केलं आहे.