हायवेवर स्टंट करणं पडलं महागात! डिव्हायडरला धडकून कारचे तुकडे... अंगावर शहारे आणणारा Video
अपघाताचा असा Video तुम्ही पाहिला नसाल, तरुणाचं भरधाव वेगात असणाऱ्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली
Car Accident : हायवेवर भरधाव वेगात स्ंटट (Stunt) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना डिव्हायरडर धडकून कारच्या (Car Accident) अक्षरश: चिंधड्या उडाल्या. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. कारमधील तरुण सुदैवाने थोडक्यात वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढचा तपास सुरु केला.
काय आहे नेमकी घटना
पंजाबमधल्या नवाशहरातील 344 ए नॅशनल हायवेवर (National Highway) हा भीषण अपघात झाला. अमृतसरमध्ये राहाणारा 24 वर्षांचा तरुण हायवेवर स्टंट करत होता. यावेळी त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरश: तुकडे झाले.
अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. घटनास्थळापासून जवळ असलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हायवेवरुन मागून येणाऱ्या कारमधल्या काही लोकांनी मोबाईलमध्ये अपघाताचा व्हिडिओ कैद केला आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली. काही लोकांच्या मते चालक अतिवेगाने कार चालवत स्टंट करत होता. त्यावेळी चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली.
नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू
दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. उसाने भरलेल्या ट्रॅकर ट्रॉलीने बोलेरोला धडक दिली. यात बोलेरोमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये नवरदेव, त्याचे वडिल आणि मेहुण्याचा समावेश आहे. याशिवाय तीन जणं गंभीर जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशमधल्या हरपालपूरमधल्या शाहजहांपूर इथल्या मुलीचं अभायन गावातील मुलाशी लग्न जुळलं होतं. लग्नासाठी नवरदेव आणि काही नातेवाईक अभायनहून शाहजहांपूर इथं बोलेरोने जात होते. दरियाबाद इथं एका ट्रॅक्टर ट्रॉलीने बोलेरोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचे अक्षरश: चिंधड्या झाल्या. या अपघातात नवरेदव आणि त्याच्या मेहुण्याचा जागीच मृत्यू झाला.