मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळे तेथे येण्याचा मोह कोणीही थांबवू शकत नाही आणि एकदा का एखादा व्यक्ती तेथे आला, तर त्याचे तासनतास कसे निघून जातात हे त्याचं त्याला कळत नाही. सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे कन्टेन्ट आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो फारच धक्कादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ  एका स्कुटरचा आहे जो पाहून तुम्ही विचार करत बसाल, परंतु तरी देखील तुम्हाला या मागचं उत्तर मिळणार नाही.


सोशल मीडियावर आपण इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल, परंतु हा व्हिडीओ त्याहून धक्कादायक आहे.


या व्हिडीओला कोणी भुतांसोबत जोडत आहे, तर कोणी अलौकिक शक्ती सांगत आहे. काहीजण याला रिमोट कंट्रोलमुळे घडल्याचे सांगत आहेत. परंतु यामागचं सत्य कोणालाही ठावूक नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक गाड्या तेथे पार्क केलेल्या आहेत. परंतु अचानक तेथून एक गाडी सुरु होते आणि चालू लागते. त्यागाडीवर कोणीही बसलेलं नाही, तरी देखील ती स्कूटी कशी सुरु झाली हे कोणालाही कळलेलं नाहीय. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सगळेच लोक घाबरले आहेत.


तर अनेक लोक याला कोणतीही युक्ती असल्याचे सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. अनेक लोक याला शेअर आणि लाईक्स देखील करत आहेत.