घोड्याचा `असा` डान्स पाहून, नवरदेव कोमात, वऱ्हाडी जोमात
सध्या या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक घोडा नाचताना दिसत आहे.
मुंबईः सध्या या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या व्हिडिओमध्ये एक घोडा नाचताना दिसत आहे. या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. डीजेचा आवाज ऐकून एक घोडाही जोरदार नाचू लागतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
भारतात लग्नाचा मोसम सुरू आहे. विवाहाचे वातावरण केवळ वधू-वरांसाठीच नाही तर कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसाठीही समान आनंद आणते. लग्नाच्या निमित्ताने सगळीकडे नाच-गाणे, मस्ती सुरू असते. मिरवणुकीत सगळ्यात जास्त मजा येते, जेव्हा वराला घोड्यावर बसून मिरवणूक काढली जाते. सध्या या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक घोडा नाचताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत एक घोडा जोरदार नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वराची मिरवणूक वधूच्या घरी आली आहे. यादरम्यान डीजेचा आवाज ऐकून एक घोडाही जोरदार नाचताना दिसतो. घोड्याचा डान्स पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
व्हिडीओ पाहून घोड्याला नाचायला शिकवल्याचं दिसतंय. त्याला डान्स कुणी शिकवला असेल, हे विचार करायला लावणारं आहे. डीजेच्या तालावर माणसांना नाचताना तुम्ही पाहिलं असेल, पण घोडा असा अप्रतिम डान्स करताना पाहणं खूपच आश्चर्यकारक आहे. तुम्ही यापूर्वी असा डान्स कधीही पाहिला नसेल.
हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक देखील केले आहे.