Corona Vaccine : लॅबपासून तुमच्यापर्यंत अशी पोहोचणार कोरोना लस
जाणून घ्या कोरोना लसीचा प्रवास
मुंबई : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने दोन कोरोना व्हॅक्सीन (Corona Vaccine) ला वापरायची परवानगी दिली आहे. यानंतर नागरिकांच्या मनात एक प्रश्न उभा राहत आहे की, या व्हॅक्सीनेशनची (Vaccination) प्रक्रिया केव्हा सुरू होणार? या प्रश्नावर मंगळवारीच केंद्रीय स्वास्थ मंत्रालयने पत्रकार परिषदेत या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. १३ जानेवारीपासून देशभरात व्हॅक्सीनेशनला सुरूवात करण्याचे संकेत दिले आहेत.
मात्र या घोषणेनंतर नागरिकांच्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण होत आहेत. आता नागरिकांना दुसरा प्रश्न पडला आहे की, ही लस सामान्यांपर्यंत कशी पोहोचेल. याकरता कुठे रजिस्ट्रेशन करावं लागेल का? जाणून घ्या लसीचा लॅब ते तुमच्यापर्यंतचा प्रवास...
सर्वात प्रथम व्हॅक्सीनची निर्माती कंपनी विमान सेवेच्या माध्यमातून प्रायमरी व्हॅक्सीन स्टोरला पाठवण्यास सुरूवात करेल. संपूर्ण देशात ४ प्रायमरी व्हॅक्सीन स्टोर करनाल, मुंबई, चेन्नई आमि कोलकातामध्ये बनवली जाणार आहे. येथे व्हॅक्सीन त्याच्या मागणीनुसार पुरवठा केला जाणार आहे. हे सर्व कोल्ड चेन प्वॉइंट्स आहेत. व्हॅक्सीनचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
यानंतरची जबाबदारी ही राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाची असणार आहे. प्रायमरी स्टोर व्हॅक्सीनला रेफ्रिजरेडिट व्हॅनमार्फत जिल्ह्याच्या स्टोरपर्यंत पाठवण्यात येणार आहे. यानंतर जिल्हा स्टोरमधून व्हॅक्सीनला प्रायमरी हेल्थ सेंटर पोहोचवलं जाईल. सरकारने संपूर्ण देशात ३७ जिल्ह्यात व्हॅक्सीन स्टोर बनवले आहेत. जेथे प्रायमरी व्हॅक्सीन स्टोर सारखी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
प्रत्येक प्रायमरी, स्टेट आणि जिल्हा व्हॅक्सीन स्टोरमध्ये लाइव्ह व्हॅक्सीन टेंपरेचर डिजिटली ट्रॅक होणार आहे. कारण या प्रोग्रामचा संचालक कोणती अडचण आल्यावर हेड ऑफिसवरून लाइव्ह पाहू शकतात. यानंतर व्हॅक्सीन कॅरिअरचं काम सुरू होईल.
सगळ्यांना करावं लागणार रजिस्ट्रेशन
कोविन ऍप सामन्य जनतेला आधारशी जोडून रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ऍपला आज Play Store किंवा Apple Store च्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकतात. हे ऍप १२ भाषांमध्ये काम करतात. सरकारने या ऍपला डिजीलॉकरशी जोडलं आहे. व्हॅक्सीन घेतल्याचं सर्टिफिकेट तुम्ही कोविन ऍपमध्ये सुरक्षित ठेवू शकतात.
रजिस्ट्रेशनकरता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता
नागरिकांच कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनकरता फोटो आयडेंटी कार्ड असणं आवश्यक आहे. याकरता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रांची आवश्यकता आहे.