मुंबई: गेल्या दोन वर्षात अनेक चक्रीवादळाचा सामना केला आहे. या चक्रीवादळाची नावं कशी ठेवली जातात याचं कधी विचार मनात आला आहे का? एखाद्या नवजात शिशुचं नाव ठेवण्यासाठी जेवढा विचार केला जातो त्यापेक्षा जास्त विचार या वादळांची नाव ठेवण्यावर केला जातो. याची साधारण कल्पनाही आपल्याला नसेल. याच याच बद्दल जाणून घेणार आहोत. वादळांची नावं कशी ठरतात कोण ठेवत आणि त्यामागे काय विचार असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळं येण्याचं प्रमाण वाढलं आहे. 2019 मध्ये फणी, 2020 मध्ये अम्फान, 2020 मध्ये निसर्ग, गुलाब, तौत्के, यासी, क्यारो, वायु, हिक्का, बुलबुल अशी अनेक चक्रीवादळ येऊन गेली. आता जवाद चक्रीवादळ देशात घोंघावत आहे. ज्याचा फटका तमिळनाडू, ओडिसा या भागांना बसणार आहे. 


कसं होतं चक्रीवादळाचं नामकरण


प्रत्येक चक्रीवादळाचं एक खास नाव असतं. चक्रीवादळाचं नाव ठेवण्याची जबाबदारी 13 देशांमध्य़े वाटून देण्यात आली आहे. या 13 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. जागतिक हवामान विभागांतर्गत फॅले वॉर्निंग सेंटरकडून ही नाव ठेवण्यात येतात. ज्या देशामध्ये चक्रीवादळाचा धोका आहे अशा देशाच्या गटांना अनुक्रमे वादळाची नावे दिली जातात.


कोणते 13 देश नाव ठरवतात?


13 देशांना अल्फाबेटनुसार नाव ठेवण्याची संधी दिली जाते. या 13 देशांच्या यादीमध्ये भारतासह बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतर, साउदी अरब, UAE आणि यमन देशांचा समावेश आहे. 


यापूर्वी 2004 मध्ये या गटात समाविष्ट आठ देशांनी 64 नावांची यादी अंतिम केली होती. त्यानंतर प्रत्येक देशातून आठ नावे आली. गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात धडकलेल्या चक्रीवादळ अम्फान हे त्या यादीत आडनाव होते. या यादीत पहिले नाव अरबी समुद्रातून उठलेल्या निसर्गाचे आहे. त्याचे नाव बांगलादेशनं ठेवलं होतं. यास चक्रीवादळाचं नाव ओमनकडून देण्यात आलं होतं.  


चक्रीवादळ कसं तयार होतं?


समुद्रात वाढत्या उष्णतेमुळे हवा गरम होते. तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. या भागात हवा गरम होते आणि दाब वाढणारा असतो. ही हवा लवकर वर सरकत असते. या गरम वाफा वर जातात तेव्हा त्यापासून ढग तयार होतात. त्याच वेळी मधल्या पट्ट्यातील रिकामी जागा भरण्यासाठी ओलसर हवा वेगानं खाली येते. यामुळे प्रेशर वाढतं. ढग एकमेकांवर आदळतात. 


जेव्हा समुद्रावरून येणारी हवा वेगानं फिरते तेव्हा त्याचा वेग जास्त असतो. त्यामध्ये खूप ताकद असते आपल्यासोबत येणाऱ्या वस्तू, गोष्टी झाडंही उन्माळून पडण्याची ताकद या हवेत असते. काहीवेळा ही चक्रीवादळ जमिनीलगत येऊन किंवा जमिनीवर येत शांतही होतात. तर काही चक्रीवादळं समुद्रात शांत होतात. 


महाराष्ट्रात निसर्ग, तौत्के चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. तर जवाद चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला होता. गेल्या काही वर्षात चक्रीवादळाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हवामानातही कमालीचा बदल होत आहे.