कोरोना संसर्गाची तिसरी लाट किती खतरनाक? तज्ज्ञांनी केला गंभीर दावा
कोविड संसर्गाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्यवस्थित केले गेले नाही तर, संसर्गाची तिसरी लाट ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये उसळी घेईल.
नवी दिल्ली : कोविड संसर्गाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्यवस्थित केले गेले नाही तर, संसर्गाची तिसरी लाट ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये उसळी घेईल.
नव्या स्ट्रेनचा धोका
सूत्र मॉडेलनुसार कोविड १९ च्या गणितीय अनुमानावर काम करणाऱ्या मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटले की, विषाणूचा नवीन स्ट्रेन तयार झाल्यास तिसरी लाट आणि जास्त वेगाने पसरू शकेल.विज्ञान आणि संशोधन विभागाने गेल्या वर्षी गणितीय मॉडेलचा उपयोग करून कोरोना विषाणूच्या संसर्गात वृद्धीचा अंदाज लावण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
आयआयटी कानपूरचे डॉ. अग्रवाल याच्या व्यतिरिक्त आयआयटी हैद्राबादचे वैज्ञानिक एम विद्यासागर आणि ले. जनरल माधुरी कानिटकर यांचासुद्धा या समितीत सहभाग आहे.
देशात सुरू असलेले लसीकरण, नव्या स्ट्रेनचा धोका इत्यांदीचा अभ्यास करून विस्तृत रिपोर्ट लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.