नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमनची फाशी सुप्रीम कोर्टानं कायम केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गांधींनी तत्कालीन राष्ट्रपतींना याकूब मेमनची फाशी माफ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे याकूबला वाचवण्यासाठी शिफारस करणारे गांधीना आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.