नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. NDA कडून द्रोपदी मुर्मू तर UPA कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत.आज होणा-या या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. पण हे मतदान नक्की होतं कसं? मतदानासाठी कोणती पद्धत वापरली जाते याबद्दल आज जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईव्हीएमचा वापर का नसतो? 
राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक ही नेहमीच्या निवडणुकीसारखी नसते. त्यासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. साध्या कागदावर किंवा पोस्टल मतांसारखी सोयंही तिथे नसते. ईव्हीएम हे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी वापरले जाते. इथे विशेष मतपत्रिका असतात. 


खासदार आणि आमदारांना वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका का दिल्या जातात?
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानादरम्यान खासदार आणि आमदारांना वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका दिल्या जातात. खासदारांना हिरवा तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका मिळतात. मतमोजणीच्या वेळी रिटर्निंग अधिकाऱ्यांना मतमोजणी करणे सोपे जावे म्हणून असे केले जाते.


मतदानाची गुप्तता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीतील रिटर्निंग ऑफिसर आणि मतदारांना त्यांच्या मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी जांभळ्या शाईने एक विशेष प्रकारचा पेन उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे मतदान केलं जातं.