मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी नेमकं काय करायला हवं? हा प्रश्न प्रत्येक देशांना पडला असताना. भारतातील केरळ राज्यांना सगळ्यांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. यामुळे केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा यांच जगभरात कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० जानेवारी रोजी आरोग्यमंत्री शैलजा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसची माहिती ऑनलाईन वाचली आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की,'हे आपल्याकडे भारतात येईल का?' तेव्हा अधिकाऱ्यांनी 'हो नक्कीच'. तेव्हापासूनच आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली. 


महत्वाची बाब म्हणजे यानंतरच भारतात बरोबर ११ दिवसांनी सर्वात पहिला कोरोनाबाधित रूग्ण हा केरळमध्ये सापडला होता. ३० जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला कोरोनाबाधित रूग्ण सापडला. जवळपास साडे तीन महिन्यानंतर केरळमध्ये ६०१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


महत्वाचं म्हणजे केरळमधील कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. केरळमधील कोरोना समाजात पसरलेला नाही. केरळची लोकसंख्या ही साडे तीन करोड लोकसंख्या असून युकेची लोकसंख्या ही केरळच्या दुप्पट आहेत. युकेमध्ये आता ४० हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ८२ हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६३ वर्षीय आरोग्य मंत्री शैलजा या पेशाने शिक्षिका होत्या. आरोग्य मंत्री शैलजा या जगभरात कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या 'खेळाडू' आणि 'रॉकस्टार हेल्थ मिनिस्टर' म्हणून चर्चा होत आहे. 


कोरोनाला कसं केलं नियंत्रित 


आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अगदी दोन दिवसांनी २४ जानेवारी रोजी केके शैलजा यांनी कोरोनाबाबत रॅपिड रिस्पॉन्स टीमसोबत मीटिंग केली. अगदी पुढच्या दिवसापासूनच कंट्रोल रूममध्ये बसून सर्व जिल्ह्यातील मेडिकल अधिकाऱ्यांना याबाबत तयारी करण्यास सुरूवात केली. २७ जानेवारी रोजी केरळमध्ये कोरोनाचा संशयीत रूग्ण आढळला आहे. पुढील तीन दिवसांतच रॅपिड रिस्पॉन्स टीमने जागतिक आरोग्य संस्थेचे (WHO) सर्व नियम जाळून घेतले आणि त्यांच काटेकोरपणे पालन केलं. 


चीनमधील वुहानमधून आलेल्या दोन मेडिकल विद्यार्थिनींमध्ये जास्त ताप होता. इतर नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. यांना कोविड-१९ ची संपूर्ण माहिती देणार मल्याळम भाषेतील पत्रक देण्यात आलं. जे अगोदरच छापून घेण्यात आलं होतं. 


ज्या दोन विद्यार्थिनींना जास्त ताप होता त्या दोघीही कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाल्या. मात्र त्या दोघींमध्ये ताप आणि खोकल्याच्या त्रासा व्यतिरिक्त इतर त्रास कोणताच नव्हता. आरोग्यमंत्री केके शैलजा यांच्या म्हणण्यानुसार आता लढाई सुरू झाली होती. दोन्ही पेशंटवर उपचार सुरू झाले होते. तोपर्यंत कोरोना व्हायरसने फेब्रुवारी महिन्यात इतर देशांमध्ये देखील शिरकाव केला होता. 


फेब्रुवारी महिन्यात एक मोठं संकट समोर आलं. जेव्हा इटलीतील वेनिसमधून आलेल्या एका कुटुंबाने एअरपोर्टवर आपली ट्रॅव्हल इतिहास लपवला. त्यानंतर आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या सगळ्या व्यक्तींना शोधून काढून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं. यामधील ६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 


जेव्हा केरळमध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधितांचा आकडा झाला तेव्हा जवळपास १ लाख ७० हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं. या सर्व लोकांवर करडी नजर ठेवण्यात आली. या व्यक्तींशी दररोज आरोग्य कर्मचारी भेट घेत होते. त्यानंतर हा आकडा कमी होऊन २१ हजारांपर्यंत पोहोचला आहे.  


केके शैलजा यांच्या म्हणण्यानुसार कम्युनिटी किचनद्वारे १.५ लाख अप्रवासी मजुरांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. या मजुरांच्या जेवणाची पूर्ण जबाबदारी सरकारने घेतली. दिवसातून तीन वेळा या मजुरांना जेवण देण्यात यायचं. आणि आता या मजुरांना ट्रेन सोडून पुन्हा आपल्या राज्यात जाता येणार आहे. 


शैलजा यांनी या व्हायरसच्या परिस्थितीवर चांगल नियंत्रण मिळवलं आहे. गेल्यावर्षी व्हायरस हा सिनेमा तयार करण्यात आला ज्यामध्ये शैलजा यांनी निपाहवर कशा पद्धतीने मात केली हे दाखवण्यात आलं. २०१८ मध्ये केरळात निपाह व्हायरस पसरला होता. तेव्हा केरळ सरकारने त्याच्यावर खूप चांगली मात केली होती.