मुंबई : बऱ्याचदा आपल्यासोबत असे होते की, आपल्या घरी पाहुणे येतात आणि अचानक गॅस संपतो, तर अशा वेळेला गृहीणीची ऐन वेळेला पंचायत होते. मग अशावेळेला ती गृहिणी विचार करते की, गॅस कधी संपणार हे जर मला आधि कळलं असतं, तर किती बरं झालं असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे आणि तो कधीपर्यंत संपू शकतो हे तुम्हाला आधीच कळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे पाहाण्यासाठी सिलेंडर उचलतात आणि वजनानुसार त्यात उरलेल्या गॅसचा अंदाज लावतात. तर असे काही लोक आहेत, ज्यांना जळणाऱ्या गॅसचा रंग निळ्या ते पिवळा होतो तेव्हा समजते की सिलेंडरमधील गॅस संपणार आहे. परंतु याचा आपण फक्त अनुमान लावू शकतो, पण त्याचे अचुक उत्तर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण शेगडीच्या बर्नरमध्ये समस्या असल्यामुळे देखील ज्योतीचा रंगही बदलतो.


परंतु आम्ही तुम्हाला सांगणार असलेली पद्धत केवळ सोपीच नाही तर तुम्हाला अचूक परिणाम देईल.


नेमका सोपा मार्ग कोणता?


ओलसर कापडाच्या मदतीने सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला अचुक पद्धतीने कळू शकते. सर्वप्रथम, तुम्हाला गॅस सिलेंडरला भिजवलेले कापड गुंडाळावे लागेल आणि सुमारे 1 मिनिट थांबावे लागेल. वेळ संपल्यानंतर कापड काढून टाका आणि नंतर काही काळ सिलिंडरमधील बदल लक्षात घ्या. तुम्हाला दिसेल की, सिलेंडरचा काही भाग कोरडा असेल, तर काही भाग ओला राहील.


हे असे घडते कारण सिलेंडरचा रिकामा भाग गरम असतो आणि पाणी पटकन शोषले जाते. सिलेंडरचा ज्या भागात गॅस भरला आहे तो भाग थोडा थंड राहतो आणि त्या ठिकाणी पाणी सुकण्यास थोडा वेळ लागतो.


त्यामुळे असे केल्याने तुम्हाला लगेच समजेल की, तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे ते. ही पद्धत एकदम सोपी आणि अचुक रिझल्ट देणारी आहे.