Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Cost of Train : कमीत कमी खर्चामध्ये आणि लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रेनला पहिली पसंती देतो. ट्रेनने प्रवास करताना ट्रेन किती डब्यांची आहे? ट्रेनचा साधारण स्पीड काय असू शकतो? असे अनेक प्रश्न पडत असतात. पण तुम्हाला माहितीये का? एक ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Vande Bharat Train News in Marathi : प्रवास जवळचा असो किंवा लांबचा प्रवास...ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? एक ट्रेन बनवायला किती खर्च येईल? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे?
ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो?
ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे कोच असतात. ज्यामध्ये जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोचचा समावेश आहे. जनरल कोचेला बांधण्यासाठी एक कोटी रुपये खर्च येतो. एक स्लीपर कोच तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. एक एसी कोचला तयार करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च येतो. तसेच एका इंजिनची किंमत 18 ते 20 कोटी रुपये आहे. 24 डब्यांची संपूर्ण ट्रेन तयार करण्यासाठी रेल्वेला सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च येतो.
वेगवेगळ्या गाड्यांचा वेगवेगळा खर्च असतो
प्रत्येक ट्रेन बनवण्यासाठी रेल्वेला सारखाच खर्च करावा लागत नाही, परंतु भारतीय रेल्वेला वेगवेगळ्या ट्रेन तयार करण्यासाठी वेगवेगळा खर्च करावा लागतो.
- 20 डब्यांच्या सामान्य मेमू ट्रेनची किंमत 30 कोटी रुपये आहे.
- 25 बोगी असलेली कालका मेल ICF प्रकारची ट्रेन बनवण्यासाठी 40.3 कोटी रुपये खर्च आला आहे.
- हावडा राजधानी LHB प्रकारातील 21 डब्यांच्या ट्रेनची किंमत 61.5 कोटी रुपये आहे.
- अमृतसर शताब्दी LHB प्रकारच्या ट्रेनच्या 19 बोगी पॅक करण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
एका इंजिनची किंमत 20 कोटी रुपये
ड्युअल मोड लोकोमोटिव्ह ट्रेनची किंमत अंदाजे 18 कोटी रुपये आहे. 4500 HP डिझेल लोकोमोटिव्हची किंमत सुमारे 13 कोटी रुपये आहे. तसेच एक सामान्य पॅसेंजर ट्रेन तयार करण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये खर्च येतो. कारण या ट्रेनमध्ये एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत सुविधांचा अभाव आहे.
वंदे भारत ट्रेनची किंमत
एका सामान्य ट्रेनची किंमत 60 ते 70 कोटी रुपयांपर्यंत असते. भारतात चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. भारतात 13 रुटवर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे 110 ते 120 कोटी रुपये आहे.