Nitin Gadkari : सामान्यांना सेलिब्रिटींप्रमाणेच राजकारण्यांच्याही खासगी आयुष्य, कमाई किंवा त्यांची आयुष्य जगण्याची पद्धत याबद्दल कायमच आकर्षण असते. काही राजकारणी अगदी मनमोकळेपणाने त्याबद्दल भाष्य करतात तर काही नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील त्यातीलच एक नाव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्वासाठी कायमच ओळखले जातात. आपल्या आयुष्यातील अनुभवांचे किस्से ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. असाच एका किस्सा सांगताना नितीन गडकरी यांनी आपल्या कमाईबाबतही (Nitin Gadkari YouTube Earning) माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी (Nitin Gadkari Interview) यांनी आपण युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावत असल्याची माहिती एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना दिली. आपल्या भाषणांना युट्यूबवर अपलोड करुन कमाई करत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. युट्युबवर नितीन गडकरींचे 4 लाख ६१ हजार सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे युट्युबवरूनही (YouTube) गडकरी दर महिन्याला भरपूर कमाई करतात.


नितीन गडकरी महिन्याला युट्यूबच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 3 लाख रुपये कमावतात. "प्रामाणिकपणे कमवा हाच माझा मंत्र आहे. शॉर्टकटचा काहीच उपयोग नाही.  पैसा हे जीवनाचे साधन आहे, पण तो शेवट असू शकत नाही. देवाने मला जे काही दिले त्यात मी खूप आनंदी आहे," असेही नितीन गडकरी म्हणाले. आपल्या कमाईचा एक हिस्सा गरिबांना दात देत असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.


फिटनेसबाबत नितीन गडकरींचा खुलासा


नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्या आयोग्याबाबतही भाष्य केले आहे. नितीन गडकरींनी त्यांचे वजन 135 किलोवरून 84 किलोपर्यंत कमी केले आहे. नियमित योगामुळे हे शक्य झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. "आपल्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही मर्सिडीज कार आणि इतर सुविधा मिळवून काय करणार आहात?," असेही नितीन गडकरी म्हणाले.


वजन कमी करुन घेतली अमिताभ बच्चन यांची भेट


मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी आपण वजन कमी केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्याचे सांगितले.नितीन गडकरी यांना पाहून अमिताभ बच्चन यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तुम्ही काय केले? तुमचं वय तर 10 वर्षांनी कमी वाटत आहे, असे अमिताभ यांनी विचारले. यानंतर अमिताभ यांना सर्व योगाप्रकार शिकवल्याचे नितीन गडकरी म्हणाले.