अवैध Offshore सट्टेबाजारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान, धक्कादायक आकडे पाहा
Offshore Online Betting In India : भारतात ऑनलाईन सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. प्रदेशातून चालवल्या जाणाऱ्या अनेक वेबसाईट्स झपाट्याने वाढतायत. परदेशातून कार्यरत अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, आपला व्यवसाय यामाध्यमातून चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने अनेकदा विविध सूचनाही जारी केल्या आहेत. रिपोर्टनुसार हा ऑनलाइन सट्टेबाजार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.
नवी दिल्ली : offshore betting apps : जगभरातील क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप. T20 वर्ल्ड कप म्हणजे अटीतटीच्या मॅचेस, कोणत्याही क्षणाला खेळ पालटू शकतो अशा मॅचेस. सध्या यासंबंधित सट्टा बाजारही तेजीत तेजी असल्याचं बोललं जातंय. भारतात 'सट्टा लावणं' अवैध आहे. मात्र असं असलं तरीही भारतात कोट्यवधी, अब्जावधींचा सट्टा लागतो. अवैध ऑनलाईन पद्धतीने सट्टा लागल्याने सट्टेबाजांना पकडणं कठीण होतं. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होतंय. सध्या कोणताही व्यक्ती कुठेही सट्टा लावू शकतो. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतातील सट्टा बाजार हा तब्बल 10 लाख कोटींच्या पार गेला आहे. अशात या क्षेत्राचा योग्य वापर करून घेतल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला याने फायदा होऊ शकते.
10 लाख कोटींचा अवैध सट्टेबाजार
दोहामधील इंटरनॅशनल सेंटर फिशर स्पोर्ट्स सिक्युरिटीने 2016 मध्ये एक रिपोर्ट प्रदर्शित केला होता. त्यावेळी अवैध सट्टेबाजार 150 बिलियन म्हणजेच 10 लाख कोटी रुपयांचा होता. अशातच जस्टीस लोढा कमिटीने भारतीय सट्टाबाजार हा तब्बल 82 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 6 लाख कोटींचा आहे.
भारत सरकारने जारी केलेली ऍडव्हायजरी
3 ऑक्टोबरला सरकारद्वारा एक ऍडव्हायजरी जारी करण्यात आली होती सट्ट्यांबाबतच्या जाहिराती दाखवणे बंद करावे, असे स्पष्ट निर्देश त्यामध्ये देण्यात आले होते. सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्या जातायत हे सरकारने नाव घेऊन सांगितलं होत. सरकारने हेही सांगितलेलं की या जाहिराती थांबल्या नाहीत तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
कोणकोणते ऍप्स असं करतात?
"सरकारच्या हेही निदर्शनास आले आहे की टेलिव्हिजन तसेच OTT प्लॅटफॉर्मवरील अनेक स्पोर्ट्स चॅनेल अलीकडे परदेशी ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म तसेच त्यांच्या सरोगेट न्यूज वेबसाइट्सच्या जाहिराती दाखवत आहेत. या ऍडव्हायजरीला उधाहरणासोबत प्रसारित करण्यात आलेलं ज्यामध्ये फेयरप्ले, परीमॅच, बेटवे, वुल्फ 777 आणि 1xबेट सारख्या बाहेरदेशातील सट्टेबाज प्लॅटफॉर्मच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती दाखवल्या जात होत्या. सरोगेट न्यूज वेबसाईट्सचे लोगो बेटिंग प्लॅटफॉर्मसारखेच असतात."
अवैध सट्टेबाजीवर लगाम, अर्थव्यवस्थेला कशी मिळेल मजबुती?
फेडरेशन ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (FICCI) ने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये सट्टा बाजार हा साधारणतः 41 बिलियन डॉलर्स म्हणजेच 3 लाख कोटींचा असल्याचं सांगितलं गेलेलं. या रिपोर्टमध्ये असं देखील म्हंटलं होतं की, जर या क्षेत्राला योग्य कायदेशीर स्वरूप देऊन वापर केल्यास, यामधून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होऊ शकतं. जस्टिल लोढा समितीनेही इंग्लंडचं उदाहरण देत नमुद केलेलं की, सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास खेळाशी संबंधित अनेक समस्या संपुष्टात येतील.
ऑनलाईन बेटिंगमध्ये वाढ
आधीपेक्षा चांगलं आणि जलद इंटरनेट स्वस्त स्मार्टफोन्स आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता यामुळे ऑनलाईन सट्टेबाजारात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. यामुळे सर्वसाधारण किंवा मध्यमवर्गीय अतिशय सोप्या पद्धतीने सट्टा खेळू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉमवर टॉसपासून, बॉलर्स कसे खेळतील ते अगदी कोण शतक ठोकेल अशा कोणत्याही गोष्टीवर सट्टा लागू शकतो. कुणीही IPL च्या कोणत्याही काल्पनिक पैलूंवर सट्टा लावू शकतो.
फास्ट
सट्टेबाजीविरोधात कठोर पावलं
भारतात ऑनलाइन सट्टेबाजी जोर धरतेय. देशाबाहेरील अनेक ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म भारतात त्यांचा व्यवसाय चालवतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या वेळी विविध सूचनाही जारी केल्या आहेत. यासोबतच, गेल्या काही महिन्यांमध्ये ED ने ऑफशोर ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या अनेक कंपन्यांवर छापेमारीही केली आहे.