पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये (kuno national park) त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांना सोडले. चित्ते (cheetahs) पिंजऱ्यातून बाहेर पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांचे फोटो काढले. दरम्यान,  तब्बल 70 वर्षांनंतर चित्ता देशात परतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात चित्त्यांच्या (cheetahs) घटत्या संख्येमुळे त्यांचा समावेश संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या यादीत झाला आहे. या चित्तांवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट कॉलर आयडीची (satellite caller id) मदत घेतली जात आहे. पण हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते कसे काम करते? चला जाणून घेऊया...


चित्त्यांना भारतात आणून आणि त्यांना जंगलात सोडल्यानंतर काम संपलेलं नाही. आता या चित्त्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. मात्र घनदाट जंगलात अनेक चित्त्यांवर नजर ठेवणे सोपे नाही. त्यामुळे त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या परिसरात ठेवण्यात येणार आहे.


गळ्यात सॅटेलाइट कॉलर आयडीमुळे (satellite caller id) त्यांची हालचाल आणि आरोग्याबाबत गोष्टींचा रेकॉर्ड ठेवणे सोपे होणार आहे.  हे तंत्रज्ञान बऱ्याच काळापासून वापरात आहे.


अ‍ॅनिमल मायग्रेशनचा ट्रॅकिंगचा (tracking id) वापर जंगलात प्राणी कोणत्या प्रकारच्या क्रिया करतो, किती सक्रिय असतो, कोणत्या वेळी अधिक सक्रिय असतो आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे शोधण्यासाठी केला जातो. या ट्रॅकरचा (Tracker) प्राण्याच्या दिनचर्येवर किंवा त्याच्या सभोवतालच्या वातावरणावरही परिणाम होत नाही आणि त्याला आरामदायी वाटते. 


सॅटेलाइट कॉलर आयडी कसे काम करते?


चित्यांच्या गळ्यात घालण्यात आलेल्या सॅटेलाइट कॉलर आयडीमध्ये स्मार्टफोन किंवा इतर मोबाइल उपकरणांमध्ये जीपीएस चिप असते. या चिपच्या मदतीने सॅटेलाईट प्राण्यांच्या स्थितीत आणि स्थानातील बदल शोधू शकतात आणि तो डेटा तज्ञांना पाठवू शकतात. कॉलर आयडी अशा प्रकारे तयार केली जाते की त्याला प्राण्यांच्या हालचालींमुळे कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही.


कॉलर आयडीच्या मदतीने केवळ प्राण्याचे ठिकाणच नाही तर त्याची शारीरिक स्थिती किंवा त्यात होणारे बदल यांचीही माहिती गोळा करता येते. असे टॅग उपग्रहाद्वारे प्राण्यांच्या शरीराचे तापमान आणि इतर आरोग्याशी संबंधित डेटा देखील मिळवू शकतात. 


जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला जंगलात सोडल्यानंतर पुन्हा पकडायचे नसेल आणि फक्त त्याचे निरीक्षण करायचे असेल  तेव्हा कॉलर आयडी उपयुक्त ठरते. या माहितीच्या आधारे, आवश्यक असल्यास उपचार किंवा मदत प्राण्यांना दिली जाऊ शकते.


मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्या डझनभर बिबट्या आणि हायना देखील आहेत, जे चित्त्यांना हानी पोहोचवू शकतात. प्रशासनाने 10 बिबट्या आणि 10 हायनावर रेडिओ कॉलर आयडी देखील लावला आहे, जेणेकरून चित्तांभोवती त्यांची वागणूक आणि वर्तनाचा मागोवा घेता येईल. कॉलर आयडीमुळे हे प्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत याची काळजी घेता येईल आणि अशा घटनांना आळा बसू शकेल.