मुंबई : देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा प्रवासासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते किंवा जावे लागते. पण त्याआधी तुमचा पासपोर्ट तयार असणे गरजेचे आहे. पासपोर्ट काढण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. परंतू हे काम आता घरबसल्या करता येणार आहे. (How to Apply Passport Online)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारने पासपोर्ट मिळवण्याची सर्व प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. लोकांना कमी वेळेत आणि कोणत्याही अडचणींशिवाय पासपोर्ट मिळावा यासाठी ऑनलाइन प्रक्रियेची सुविधा देण्यात आली आहे. पासपोर्ट ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.  पुढील काही स्टेप्स वापरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.


पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?


  • सर्वप्रथम पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलला भेट द्या.(लिंक)

  • होमपेजवर नवीन युजर्स नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  • विचारलेले सर्व तपशील भरा.

  • नंतर शेवटी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि नोंदणी बटणावर क्लिक करा.

  • त्यानंतर User Login च्या पर्यायावर जा.

  • आता नोंदणीच्या वेळी तयार केलेल्या लॉगिन आयडीच्या मदतीने येथे लॉगिन करा.

  • त्यानंतर Apply for Fresh Passport and Re-issue of Passport साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर सर्व डिटेल्स भरा आणि पे आणि शेड्यूल वर क्लिक करा.

  • तुमच्या सोयीनुसार, पासपोर्ट कार्यालयात जाण्यासाठी तारीख निवडा.

  • तुम्ही तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता.



यानंतर तुम्हाला Print Application Receipt वर क्लिक करून पावती डाउनलोड करावी लागेल. त्यानंतर प्रिंट काढावी. आणि दिलेल्या तारखेला कार्यालयात भेट द्यावी.


यासाठी लागणारी फी तुम्हाला ऑनलाइन भरता येणार आहे.