Saving Formula: सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या सर्वांनाच आपला बॅंक बॅलन्स (Bank Balance) तगडा होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. वाढत्या महागाईचे (Inflation) परिणाम आता सामान्य नागरिकांवरही होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी मग आपला मार्ग कोणताही असो त्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे आपली स्ट्रेटेजी. तुम्ही कशा पद्धतीनं व्यवस्थापन (Saving Management) करता याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्यात तुम्ही कशा प्रकारे योग्य ती बचत करू शकता हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. (how to become crorepati using 50/30/20 rule know the strategy and management with these steps business news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी एक हटके सेव्हिंग टीप आहे ज्यातून तुम्ही कोट्यवधी कमावू शकता. या सेव्हिंगचं नावं आहे 50:30:20 फॉर्म्यूला (50:30:20 Formula). यातून तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करत कोट्यवधी रूपये करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या नव्या सेव्हिंग प्लॅनविषयी (Saving Plan). आपल्या सगळ्यांकडेच 100 रूपयांची नोट असेलच. आजच्या काळात शंभर रूपयांचे (100 Rupees) महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आपल्याला या फॉर्म्यूल्याच्या सेव्हिंगमध्ये फक्त या शंभर रूपयातले 50 रूपये, 30 रूपये आणि 20 रूपये बाजूला काढावे लागतील. तुम्ही म्हणाल यातून सेव्हिंग (Saving Tips) कशा काय करता येईल? आणि त्यातून चक्क कोट्यवधी रूपये कसे काय होतील? काळजी करू नका यात योग्य त्या स्ट्रेटेजीची गरज असते. ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


काय आहे 50+30+20 फॉर्म्यूला? 


तुमच्याकडे शंभर रूपये असतील आणि त्यानुसार आपण जर का 50:30:20 चा फॉर्म्यूला काढला तर आपल्याला आपल्या सॅलरीतूनही काही पैसे बाजूला काढून त्या सॅलरीच्या पैशांतून 50:30:20 चा अप्लाय करता येईल. जसे की जर तुम्ही महिन्याला समजा 80,000 रूपये कमावत असाल तर त्यातील 30,000 रूपये जर तुम्ही बचतीसाठी बाजूला करत असाल तर तुम्हाला त्या 30,000 मधून 15000+9000+6000 या हिशोबानं पैसे काढून ठेवावे लागतील. दर महिन्याला तुम्हाला हे गणित अवलंबवणं महत्त्वाचं आहे. यातून मग तुम्ही तुमचे खर्च मॅनेज (Expenses) करू शकता आणि त्यातून तुम्ही काही पैसे सेव्ह करू शकता. 


कसा कराल पैसा सेव्ह?


पहिल्या हिस्स्यांचा वापर तुम्ही तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही पहिल्या हिस्स्याच्या वापर करू शकता म्हणजेच कुणाचे काही कर्ज असतील अथवा एएमआय (EMI). दुसरा हिस्सा तुम्हाला जो एक्झरीयस खर्च काढू शकता. जसे की सिनेमाला जाणं, मूव्ही पाहणं. तर तिसरा भाग हा तुम्ही सेव्ह (Saving Money) करू शकता. 


हेही वाचा - International Women's Day 2023: स्त्री धन काय असतं? कायद्यानुसार त्याचं महत्त्व काय, प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची माहिती


कसे व्हाल करोडपती? 


जेव्हा तुम्ही 20 च्या हिशोबानं पैसे सेव्ह करता तेव्हा वरील फॉर्म्यल्यानुसार, तुमच्या हातात दर महिन्याला 6000 रूपये सेव्ह होतात. म्हणजेे वर्षाला 6000x12=72,000 होतात. याचा वापर तुम्ही SIP मध्ये करू शकता. त्यानूसार एसआयपीतून तुम्हाला 18 टक्क्यांचे रिटर्न्स (Returns) मिळतात. जे लाखो रूपयांमध्ये असतील. त्याप्रमाणे तुम्ही सेव्ह करत करत काही वर्षांतच करोडपती व्हाल.