SIP Investment 500 Rupees : देशातील नागरीकांचा गुंतवणूकीकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे नागरीक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतायत. त्यात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी (SIP) हा गुंतवणूकदारामध्ये पंसतीचा पर्याय म्हणून समोर आला आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये एसआयपीत असंख्य नागरीकांनी गुंतवणूक केली होती. यंदाच्या वर्षी देखील ही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अद्याप अनेक लोकांना या गुंतवणूकीबाबत माहीती नाही. त्यामुळे आम्ही आज 500 रूपयांनी सुरु केलेल्या गुंतवणूकीवर किती फायदा होतो? याची माहिती देणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण फक्त 500 रुपयांची बचत आणि SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल बोलत आहोत.एसआयपी ही अशी गुंतवणूक आहे जी दर महिन्याला फंडात गुंतवता येते. तुम्ही 100 रूपयापासून तुमच्या मर्यादेपर्यंत कोणतीही गुंतवणूक करू शकता. ही बचत योग्य व्यासपीठावर आणि सल्ल्यानुसार योग्य मार्गाने गुंतवून तुम्ही परतावा मिळवू शकतो. विशेष म्हणजे गुंतवणूक कुठे केली आहे?तिथून काय परतावा मिळत आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे.  


40 वर्षे गुंतवणूक


जर तुम्ही 40 वर्षांसाठी दरमहा 500 रुपये गुंतवल्यास, एसआयपीमध्ये (SIP) तुम्ही 2,40,000 रुपये गुंतवाल. यामधून मिळणारा परतावा रु.1,54,61,878 असेल आणि वास्तविक परतावा रु.1,57,01,878 असेल. विशेष म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने महिन्याला फक्त 500 रुपये गुंतवले, तेही प्रत्येक महिन्याला सलग 40 वर्षे, तर त्याला दरवर्षी 15 टक्के दराने मिळणारा परतावा त्याला करोडपती बनवेल.


37 वर्षांतच करोडपती


जर तुम्ही 500 रूपये दरमहा 37 वर्षे गुतंवल्यास एकूण 2,22,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 98,03,320 रुपयांचा परतावा मिळेल, जो एकूण 1,00,25,320 रुपयांचा परतावा असेल. आणि अशाप्रकारे तुम्ही करोडपती व्हाल. 


35 वर्षे गुंतवणूक


जर तुम्ही दरमहा फक्त  500 रूपये  SIP मध्ये गुंतवता. आणि ही गुंतवणूक 35 वर्षांसाठी केली असेल, तर तुमची गुंतवणूक रु. 2,10,000 आहे आणि तुम्हाला रु. 72,20,322 चा परतावा मिळेल आणि एकूण परतावा रु. 74,30,322.


30 वर्षे गुंतवणूक


जर तीच गुंतवणूक 30 वर्षांसाठी केली असेल. तर समान परतावा. मग तुम्ही एकूण 1,80,000 ची गुंतवणूक करा. तुम्हाला Rs 33,24,910 चा परतावा मिळेल आणि एकूण परतावा Rs 35,04,910 असेल.


दरम्यान गुंतवणुकीत 30 वर्षे ते 40 वर्षांपर्यंतचा फरक आहे, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे दीर्घकालीन परतावा तुम्हाला एका नवीन पातळीवर घेऊन जातो.तुम्ही थोडी अधिक गुंतवणूक करू शकता आणि एक चांगला फंड देखील निवडू शकता. तुम्हाला कोणत्या स्तरावर जायचे आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे.


विशेष म्हणजे चांगल्या आर्थिक माहितीचा किंवा मार्केट तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. अशा कोणत्याही गुंतवणुकीसाठी तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.


Disclaimer : कृपया लक्ष द्या. या प्रकारच्या गुंतवणुकी बाजारातील जोखीम अंतर्गत कार्य करतात. गुंतवणूकदारांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.