मुंबई : आयआरसीटीसी (IRCTC)च्या अधिकृत वेबसाईटवर तत्काळ टिकिट बुक करणे नेहमीच सोपं नसतं. प्रवाशांना नेहमीच तत्काळ टिकिट मिळवण्यासाठी अडचणी येतात. अशा स्थितीत प्रवाशी कन्फर्म टिकिटांसाठी एजेंटला जादा पैसे देतात. आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या मदतीने सहजपणे तत्काळ टिकिट बुक करता येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेतर्फे तत्काळ टिकिट बुकिंग ट्रेन निघण्याच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजेपासून एसी क्लास आणि 11 वाजता नॉन एसी क्लास सुरू होते. IRCTC च्या वेबसाईटवरून किंवा रेल्वेच्या टिकिट काऊंटरवरून तुम्ही सध्या टिकिट खरेदी करू शकता. परंतु सिट्सची संख्या कमी असल्याने टिकिट्स लगेच मिळतीलच असे नाही. 


मास्टरलिस्ट फीचरच्या वापर


तुम्ही घर बसल्या सहजपणे टिकिट बुक करू शकता. हे फीचर वापरण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर लॉग इन करा. टिकिट बुक करताना वेगवेगळी माहिती भरण्यात वेळ जाऊ शकतो. तत्काळ बुकिंग करताना सेकंद-सेकंद महत्वाचे ठरतात. त्यामुळे अशा वेळी मास्टरलिस्ट उपयोगी येऊ शकते.


  1. My Account मध्ये जाऊन My Profile वर क्लिक करा. 

  2. येथे Add/Modify Master List चा पर्याय निवडा

  3. मॉडिफाइ मास्टर लिस्टमध्ये प्रवाशाची सविस्तर माहिती भरा.

  4. माहिती भरून आपण खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा. 

  5. यामुळे एका पॅसेजरची मास्टर लिस्ट बनेल आणि टिकिट बुक करताना My Saved Passenger List वर जाऊन थेट वेगाने टिकिट बुकिंग करता येते.