कामाची बातमी! पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच मिळू शकते ग्रॅच्युइटी; नियम समजून घ्या
Online Gratuity Calculator: पगारदार कर्मचारी, क्षणिक किंवा कंत्राटी कामगार यांना वगळता, एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्र ठरतो
Gratuity Calculator: एका कंपनीत सगल पाच वर्ष काम केल्यानंतर तो व्यक्ती ग्रॅच्युइटीसाठी (Gratuity) पात्र ठरतो, असं सर्व साधारणपणे मानलं जातं. पहिल्यांदाच एका कंपनीत कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांना ग्रॅच्युइटीबाबत फारशी कल्पना नसते. खासगी व सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ग्रॅच्युइटीचा अधिकार आहे. एकाच कंपनीत सलग काही वर्ष काम केल्यामुळं कंपनी कृतज्ञता म्हणून ग्रॅच्युइटी देऊ करतात. पण त्यासाठी एक ठराविक कालावधी पूर्ण करण्याची गरज आहे. आज आपण ग्रॅच्युइटीचे Calculation कसे करतात हे जाणून घेऊया. (How To Calculate Gratuity)
पेमेंट आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, तेलक्षेत्र, बंदरे आणि रेल्वे यांना लागू आहे. ज्या कंपनीत किमान 10 कर्मचारी आहेत अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा निवृत्त झाला तर नियमांनुसार त्याला ग्रॅच्युइटीचे पैसे मिळतात. मात्र, त्या कर्मचाऱ्याला सतत पाच वर्ष काम करते बंधनकारक असल्याचे मानले जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी दिवस काम करुनही तो कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतो. जाणून घेऊया कसं?
ग्रॅच्युइटी कायद्यानुसार कलम 2A अंतर्गंत 'सलग काम करणं' या अंतर्गंत पाच वर्ष काम न केल्यानं अनेक कर्मचारी ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. ग्रॅच्युइटी कायद्यानुसार कलम 2A नुसार भूमिगत खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सलग चार वर्ष 190 दिवस काम केले तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. तर इतर संस्थांमधील कर्मचारी चार वर्ष 240 दिवस (4 वर्ष 8 महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. यावेळी कर्मचाऱ्याचा नोटिस पिरीयडदेखील यामध्ये नोंदवला जातो. कारण नोटिस कालावधी सलग सेवामध्ये गणला जातो.
ग्रॅच्युइटीचं कॅल्क्युलेशन कसं होतं?
कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी कशी मिळणार यासाठी एक समीकरण ठरलेले आहे. कर्मचाऱ्याची एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार)X (15/26) X (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) यानुसार कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युइटीची रक्कम ठरवली जाते. उदाहरणार्थ तुम्ही एकाच कंपनीत सलग सात वर्ष काम केलं असेल आणि तुमचा शेवटचा पगार 35 हजार रुपये आहे तर ग्रॅच्युइटीच्या कॅल्कुलेशननुसार तुम्हाला (35000) X (15/26)x(7)= 1,41,346 इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकते. विशेष म्हणजे ग्रॅच्युइटीची रक्कम करमुक्त असते. हा नियम सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होतो.