एका टॉवेलमुळं कळेल तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिलाय; `ही` ट्रिक वापरुन बघाच
Gas Cylinder Tips: जेवण बनवत असताना अचानक गॅस सिलेंडर संपून जातो. अशावेळी गृहिणींची मोठी पंचायत होते. मात्र एका ट्रिकने तुम्ही ही परिस्थिती हाताळू शकता.
Gas Cylinder: गॅस सिलेंडरचा अविष्कार हा गृहिणींसाठी वरदानच ठरला आहे. पूर्वीच्या काळात चुलीसमोर बसून तास् न तास जेवण शिजवण्यासाठी वाट पाहावी लागायची. मात्र आता गॅस सिलेंडरमुळं गृहिणींचे काम सोप्प झालं आहे. काही मिनिटांतच संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. पण कधी कधी सिलेंडरमधला गॅस संपल्यावर मोठी पंचाईत होते.
घरातील गॅस सिलेंडर कधी संपेल याची तारीख किंवा काही लक्षणांमुळं गृहिणींच्या चांगलंच लक्षात राहते. त्यानुसारच त्या आधीपासून गॅसची नोंदणी करुन ठेवतात. पण कधी कधी कामाच्या गडबडीत विसरुन जायला होतं. जेवण बनवत असताना सिलेंडरमधील गॅस संपला तर मोठी तारांबळ उडते. अशावेळी तुम्ही एका टॉवेलच्या सहाय्याने सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाऊन घेऊ शकता.
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल खूप फायदेशीर ठरु शकतो. या ट्रिकमुळं तुम्हाला लगेच कळेल की सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे आणि तो किती दिवस पुरेल. तर आत्ताच समजून घ्या या टिप्स
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घेऊन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. सिलेंडरची टाकी टॉवेलमुळं ओली झाल्यावर टॉवेल बाजूला काढून टाका. त्यानंतर सिलेंडरच्या टाकीचे बारकाईने निरीक्षण करा. सिलेंडरचा कोणता भाग लवकर वाळत आहे तसंच, कोणता भाग जास्त वेळा ओला राहतोय, याचे निरीक्षण करा.
सिलेंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका राहिलेल्या भागावरुन गॅसची लेव्हल कळु शकणार आहे. टाकीचा भाग लवकर सुकला आहे त्या भागात गॅस शिल्लक नाहीये. तर, जो भाग ओला राहिला आहे त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक राहिलेला आहे. या आधारे तुम्ही गॅस किती शिल्लक राहिलेला आहे याची पाहणी करु शकणार आहे.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचे नाव LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) असतो. या गॅसमध्ये काही प्रमाणात लिक्विडदेखील असते. अशावेळी टाकीचा जो भाग कोरडा आहे त्यात गॅस नसल्यामुळं लवकर कोरडा होता. तर, ओला असलेला भाग हा गॅसच्या थंडपणामुळं ओला असतो आणि लवकर वाळत नाही.
गॅस सिलेंडरचे वजन किती असते
15 ते 16 किलो गॅस असलेल्या सिलेंडरमध्ये भरण्यात आलेल्या गॅसचे वजन 14 किलो 200 ग्रॅम असते. अशात गॅसने भरलेल्या सिलेंडरच्या टाकीचे वजन 30 किलो 200 ग्रॅम इतके असायला हवे.