तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम कशी तपासाल?
पीएफ खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी...
नवी दिल्ली : सरकारी, खासगी नोकरदार वर्गाचा पीएफ (PF) म्हणजेच एंप्लॉई प्रॉव्हिडंट फंड अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी महिन्याच्या पगारातून पीएफ अकाऊंटमध्ये जमा केला जातो. सर्वसाधारणपणे पगाराच्या १२ टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. ईपीएफ खात्याची इपीएफओ कार्यालयाकडे अधिकृत नोंद असते. EPFOच्या २०१८-१९ साठी ८.६५ टक्के दराने पीएफ खात्यात व्याज जमा होते.
असा चेक करा पीएफ खात्यातील बॅलेन्स -
जर तुमचा यूएएन (UAN) नंबर ईपीएफओमध्ये (EPFO) रजिस्टर्ड असेल तर पीएफच्या बॅलेन्सची माहिती एसएमएसच्या (SMS) माध्यमातून मिळू शकते. 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (शेवटची ENG ही अक्षरं म्हणजे ज्या भाषेत माहिती हवी आहे ती अक्षरं टाइप करणे) असं टाइप करुन SMS करावा लागेल. त्यानंतर PF खात्यातील रक्कमेची माहिती मिळू शकते.
EPFOच्या वेबसाइटवरुनही पासबुकमधील बॅलेन्स चेक करता येऊ शकतो. तसंच तुमच्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊनही खात्यातील रक्कम तपासू शकता.
तुमच्या भाषेत मिळेल माहिती -
इंग्रजी, मराठी, पंजाबी, हिंदी, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि बंगाली भाषेतही पीएफबाबतची माहिती मिळू शकते. पीएफबाबत (PF) हिंदी भाषेत माहिती हवी असल्यास, EPFOHO UAN HIN असं टाइप करुन 7738299899 नंबरवर SMS करावा लागेल.
PF खात्यातील रक्कम तपासण्यासाठी यूएनए नंबर (UNA), बँक अकाऊंट, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे.