Fashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Fashion Tips: सध्या सगळीकडे लग्नासरीला जोरात सुरवात झाली आहे, तुमच्याही घरी कोणाचं लग्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण लग्न म्हटलं की नटांना थाटणं आलं. लग्नात सर्वाना सुंदर दिसायचं असतं. महिला वर्गात तर अशावेळी सुंदर दिसण्यासाठी, चढाओढ असते. प्रत्येकीला सर्वांपेक्षा सुंदर आणि हटके दिसायचं असतं .
अशा विशेष प्रसंगी, जो ड्रेस आपण परिधान करतो त्याच्या रंगसंगतीचा साजेसा मेकअप करतो, सर्वकाही मॅचिंग घालण्यावर भर असतो. आजकाल मेकअप आणि आऊटफिटसोबत स्टायलिश नखं सुद्धा ट्रेंडमध्ये (trend) आहेत. आतापर्यंत नॅचरल नखांना सुंदर आणि स्वच्छ
ठेवण्यासाठी महिलांना खूप प्रयत्न करावे लागायचे. विशेषतः नखं वाढवताना खूप कसरत व्हायची (growing nails) ..पण मार्केट मध्ये आता फेक नेल्स (fake nails) सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे हा त्रास थोडा का होईना कमी झालाय .. (For the perfect wedding look choose nail paint that matches your skin tone)
नखं नॅचरल असो किंवा फेक त्यांना आकर्षित सुंदर बनवण्याचं महत्वाचं काम करत ते नेलपेंट..
मार्केटमध्ये एक ना अनेक रंगाचे नेलपेंट्स उपलब्ध आहेत. नेलपॉलिशचे खूप ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. अशा वेळी परफेक्ट रंग निवडणं म्हणजे आपला पुरता गोंधळ उडून जातो. आणि आपण आपल्याला जो आवडेल तो रंग निवडतो.
पण तो रंग आपल्या स्किन टोनला मॅच करेल असं नाही. (how to choose nail polish color that suits your skintone ideas fashion tips)
मात्र नेलपेंट हातावर सुंदर दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर नेलपेंटचा रंग निवडताना तुमच्या स्किन टोन नुसार तो निवडावा जेणेकरून तुमची नखं आणखी सुंदर दिसतील
चला तर मग जाणून घेऊया तुमच्या स्किन टोन वर कोणता रंग छान दिसेल.
1 पेल कॉम्प्लेक्शन (pale complexion)
जर तुमचा स्किनटोन पेल कॉम्प्लेक्शन अशा टाईप मध्ये आहे तर तुम्ही लाईट पिंक किंवा ब्लू कलर निवडू शकता (light pink nailpaint ,blue nailpaint) पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका
2 लाईट कॉम्प्लेक्शन
व्हाइट, सिल्वर, सॉफ्ट ऑरेंज, डार्क पिंक, रेड हे कलर्स तुम्ही वापरू शकता
3 टॅन कॉम्प्लेक्शन
या स्किनटोनसाठी तुम्ही कोणताही लाईट रंग जसा कि पर्पल ब्लू पिंक निवडू शकता
4 मिडीयम कॉम्प्लेक्शन
या स्किनटोन साठी डार्क कलर्समध्ये बरगंडी, वाइन कलर निवडू शकता ,वाइब्रेंट आणि लाइट कलर्स सुद्धा वापरू शकता
5 डार्क कॉम्प्लेक्शन
ब्राइट कलर्स ऑरेंज, पिंक आणि रेड हे चांगले ऑप्शन्स आहेत ग्रे आणि ब्लैक कलर्स चुकूनही लावू नका .