Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात.  क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो. कधी कधी वेळेवर पैसे न भरल्याने सिबिल स्कोरही खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला क्रेडिट कार्ड का वापरावे लागते आणि किती आवश्यक आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी क्रेडिट कार्ड निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.


विचारपूर्वक क्रेडिट कार्ड घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा लोकं कोणताही विचार न करता क्रेडिट कार्ड घेतात. मात्र, लोकांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. क्रेडिट कार्ड घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. क्रेडिट कार्डचे फायदे तुमच्या गरजेनुसार मिळतात की नाही त्याची माहिती असणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पुढील सात प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळताच क्रेडिट कार्डाची निवड करा.


बातमी वाचा- HDFC बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 1 जानेवारीपासून होणार हा बदल


7 Questions For Best Credit Card


  • तुम्ही यापूर्वी क्रेडिट कार्ड वापरलं नसेल तर त्याची खरंच गरज आहे का?

  • तुमच्याकडे आधीपासूनच क्रेडिट कार्ड आहे का?

  • तुम्हाला कोणत्या प्रकारचे सुविधा हव्या आहेत, याचा विचार करा.  रिवार्ड, कॅशबॅक की एअर मील?

  • तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खरेदीसाठी सर्वोच्च मूल्य परत हवे आहे?

  • तुम्ही विशिष्ट एअरलाइन, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म किंवा ब्रँडचे चाहते आहात का?

  • क्रेडिट कार्ड तुमच्या गरजेनुसार योग्य फायद्यांसह येत असल्यास तुम्ही वार्षिक शुल्क म्हणून ठराविक रक्कम भरण्यास तयार आहात का? 

  • फी माफी किंवा इतर फायदे मिळविण्यासाठी तुम्ही खूप खर्च कराल आणि खर्चाची मर्यादा पूर्ण करू शकाल?