How To Clean Cauliflower :  प्रत्येक महिला भाजी बनवण्याअगोदर ती भाजी स्वच्छ करून घेते. अनेकदा भाज्या धुऊन घेतल्या जातात. मात्र काही भाज्यांना फक्त इतकं करणं पुरेसं नाही. फ्लॉवरच्या भाजीचही अगदी तसंच आहे. यामध्ये असणाऱ्या अळ्यामुळे ही भाजी खाणे अनेकांना नकोसे वाटते. फ्लॉवरच्या भेगांमध्ये असंख्य हिरव्या रंगाच्या अळ्या लपलेल्या असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ही भाजी फक्त एकदा स्वच्छ करून चालत नाही. जर तुम्ही फ्लॉवरची भाजी खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही आता तो सगळा त्रास विसरा. आपण असे काही टिप्स पाहत आहोत ज्यामुळे तुम्ही या अळ्या सहज बाहेर काढू शकता. 


स्टेप्स 1 - फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा 


फ्लॉवर साफ करण्यासाठी सगळ्या अगोदर त्याचे छोटे छोटे तुकडे करा. यामुळे फ्लॉवरचा सडलेला भाग देखील सहज दिसेल आणि अळ्या देखील साफ होतात. 


स्टेप्स 2 - स्वच्छ पाण्यात धुवा 


फ्लॉवर कापल्यामुळे ते मोकळे होतात. आणि ते वाहत्या पाण्यासमोर धरा किंवा भांड्यात पाणी घेऊन ते स्वच्छ करा. 


स्टेप्स 3 - मीठाच्या पाण्यात ठेवा 


फ्लॉवरची भाजी 10 ते 15 मिनिटे मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्यामुळे फ्लॉवरमधील सगळे किडे किंवा अळ्या सहज बाहेर पडतात. मीठाचे पाणी वापरल्यामुळे भाजी बनवताना कमी मीठ टाका. 


स्टेप 4 उकळत्या पाण्यात टाका फ्लॉवर 


उकळत्या पाण्यात 5 मिनिटासाठी फ्लॉवर टाकून ठेवा. यामुळे सगळ्या अळ्या आणि पॅरासाइट तसेच किटकनाशके देखील दूर होतील. गरम पाण्यात फार वेळ फ्लॉवर ठेवू नका. त्यामुळे तो नरम पडतो आणि उग्र वास तसाच राहतो.


स्टेप 5 बर्फाच्या पाण्यात ठेवा 


जर तुम्हाला फ्लॉवरची रेसिपी क्रिस्पी करायची असेल तर भाजी थंड बर्फाच्या पाण्यात भरून ठेवा. ज्यानंतर ही भाजी खाणे सहज शक्य होईल. बर्फाच्या पाण्यामुळे सगळ्या अळ्या बाहेर पडतात आणि तो स्वच्छ होतो. 


स्टेप 6 सुखवून वापरा फ्लॉवर 


फ्लॉवरमधील किडे काढून टाकण्यासाठी ते सुकवून वापरा. याचा देखील चांगला फरक पडतो. फ्लॉवर सुकवल्यामुळे अळ्या गळून पडतील. तसेच तो खूप दिवस वापरता येईल. 


ही घ्या खबरदारी 


  • फ्लॉवर विकत घेतानाच नीट बघून घ्या. 

  • फ्लॉवर काळपट वाटत असेल तर खरेदीच करू नका 

  • फ्लॉवर फार काळ फ्रिजमध्ये ठेवू नका 

  • फ्लॉवर प्लास्टिक पिशवीत ठेवू नका