Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स
kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)
Kitchen hacks : असं म्हणतात ज्या घरात्या स्वयंपाकघरात स्वच्छता असते, त्या घरात कोणताही आजार टीकत नाही. कारण ही सर्व समीकरणं अन्नपदार्थांशी जोडलेली असतात. घरातील स्वयंपाकघरात ज्या शेगडीवर, गॅस स्टोव्हवर आपण जेवण शिजवतो, तिथं अनेकदा घाई- गडबडीमुळे एकच धांदल उडते. (Gas Stove cleaning hack)
रोज साफ न केल्याने ते अतिशय चिकट आणि खराब होऊ लागतात आणि एके दिवस काम करायचं बंद होऊन जात. मग आपण ते स्वच्छ करायला बसतो पण त्यावेळी त्यावर इतका मळ आणि चिकटपणा आलेला असतो कि आपल्याला ते स्वच्छ करण कठीण होऊन बसत. (viral trending kitchen hacks how to clean gas burners at home with help of lemon )
गॅस बर्नरच्या छोट्या छिद्रांमध्ये कचरा जमा होऊन जातो आणि परिणामी गॅस वाया (gas waste) जातो जेवण बनायला वेळ सुद्धा जातो कारण गॅस त्या छिद्रांमधून खूप कमी येतो. स्वयंपाक (cooking) करताना थोडी घाण असणे सामान्य आहे.
पण स्वयंपाकघराची योग्य देखभाल आणि स्वच्छता केली नाही तर त्यात बॅक्टेरिया (bacteria) वाढायला वेळ लागत नाही. गॅस स्टोव्ह (gas stove) ही स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. स्वयंपाक करताना अनेक वेळा वस्तू त्यावर पडतात.
जेवण बनवत असताना अनेकदा शेगडीवर तेल, पाणी, आमटी असं बरंच काही सांडतं आणि संपूर्ण शेगडी खबार होते. हे पदार्थ फार काळ या पृष्ठावर टिकून राहिल्यास त्यामुळं ते काढतानाही नाकी नऊ येतात. शेवटी शोध सुरु होतो यावर उपाय म्हणून सर्वोत्त क्लिनिंग लिक्विड खरेदी करण्याचा. पण, आता त्याचीही गरज नाही. (home grooming kitchen hacks Gas stove cleaning tips and tricks )
काही सोप्या उपायांनी तुम्हीही गॅस शेगडी क्षणात चमकवू शकता. (easy simple ideas to clean gas stove)
पाणी- पाणी उकळवून ते डाग असणाऱ्या भागांवर टाका आणि काही क्षण तसंच ठेवा. त्यानंतर एक स्पंज किंवा लिक्विड सोपच्या मदतीनं डाग स्वच्छ करा. शेगडीवर काच असल्यास पाणी जास्त गरम नसेल याची मात्र काळजी घ्या.
अमोनिया
औषधांच्या दुकानातून अगदी सहजपणे अमोनिया खरेदी करता येऊ शकतो. अमोनियापासून गॅस स्वच्छ करण्यासाठी रात्रीच्या वेळी बर्नर आणि ग्रेट्स त्यामध्ये भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वच्छ पाण्याने धुवा.
बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड
गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील.
मीठ आणि बेकिंग सोडा
एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि ते एकत्र करुन हे मिश्रण एका स्पंजनं गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरा. त्यानंतर गॅस स्वच्छ पुसून घ्या.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळूनही तुम्ही अशाच पद्धतीचं मिश्रण तयार करून स्पंजऐवजी लिंबाच्या तुकड्यानंच मिश्रण गॅसला लावू शकता. यामुळंही गॅस क्षणात स्वच्छ होईल. (how to clean gas stove in a minutes with easy simple kitchen hacks ideas )