मुंबई : सायबर क्राइमचे वाढते धोके लक्षात घेऊन Aadhaar Card बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आधार कार्डबाबात काही गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्यामुळे आधार कार्डधारकांची फसवणूक होऊ शकणार नाही. या गाइडलाईन्स पाळल्या तर नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधारकार्डचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी या नव्या गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. या नियमानुसार कोणालाही तुमच्या आधारकार्डची झेरॉक्स किंवा PDF कॉपी पाठवताना खास काळजी घ्या. आधार तुमच्या बँक खात्याला लिंक आहे. जर तुमच्या आधारकार्डवरचा पूर्ण अंक हॅकर्सच्या हाती लागला तर तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते. 


यासाठी मास्क आधारकार्डचा वापर करावा असंही म्हटलं आहे. हे मास्क आधारकार्ड नेमकं कसं मिळवायचं त्याची प्रक्रिया काय जाणून घेऊया. या आधारकार्डवर संपूर्ण नंबर दिसत नाही. तर शेवटचे 4 अंक दिसतात. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. 


Masked Aadhaar Card डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे दिलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं मास्क आधारकार्ड ओपन होईल. ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट घ्या.


तुम्हाला आधारकार्डवरील 12 अंकी नंबर साईट ओपन केल्यावर अपडेट करायचा आहे. त्यानंतर एक कॅप्चर कोड आणि OTP अपलोड करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला आधारकार्ड दिसेल. 


Do you want a masked Aadhaar? असा पर्याय दिलेला असेल. तिथे मार्क करून पुन्हा एकदा आलेला OTP अपलोड करायचा आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल. ती झाल्यावर तुम्हाला Masked Aadhaar Card डाऊनलोड करायचं आहे. 


Masked Aadhaar Card  आणि ओरिजनल आधारकार्डमध्ये नंबरचा फरक पडेल. मास्क आधार कार्डवर तुमचे नंबर येणार नाहीत. 8 अंक  XXXX-XXXX असे येतील. शेवटचे 4 अंक तुम्हाला दिसू शकतील.