मुंबई : वाढत्या महागाईमुळे सध्या केवळ पगारावर खर्च भागवणे अशक्य होत चाललंय. घर खर्चाव्यतिरिक्त इतरही खर्च इतके वाढलेयत की त्यासाठी पगार कमी पडू लागलाय. एक्स्ट्रा इनकमची गरज भासू लागलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे अनेक साईड बिझनेस आहेत ज्यामुळे तुम्ही नोकरीसोबत चांगली एक्स्ट्रा कमाई करु शकता. विशेष म्हणजे काही बिझनेससाठी इन्वेस्टमेंटही लागत नाही. 


जाणून घ्या हे पर्याय


मोबाईल टिफिन सर्व्हिस


टिफिन सेंटरचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. महिलांसोबत पुरुषही या व्यवसायात उतरतायत. कोणत्याही कमर्शियल भागात मोबाईल टिफिन सेंटर कमाईचे उत्तम साधन आहे. यासाठी थोडी गुंतवणूक लागते. मात्र कधीही तोट्यात न जाणारा हा बिझनेस आहे. 


ट्रान्सलेटर


ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही घरबसल्या अनेक कामे करु शकता. गुजरात, महाराष्ट्र अथवा दक्षिण भारतातील कोणत्याही राज्यात याची डिमांड आहे. यासाठी तुम्हाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ऑनलाईनही अनेक कंपन्या आहेत ज्यांना रिजनल कंटेट हवा असतो. १५ हजारांपासून यासाठी मिनिमम इनकम असते. 


ई-कॉमर्स कंपनीमध्ये फ्री सेलर


तुम्ही ई-कॉमर्स कंपनीमध्ये फ्री सेलर म्हणूनही पैसे कमवू शकता. यासाठी तुमचे एखादे प्रॉडक्ट हवे. या वेबसाईटवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील सारख्या कंपन्याचा बिझनेस वेगाने वाढतोय. 


योगा टीचर


सध्या लोक स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास प्राधान्य देतायत. योगांची क्रेझही वाढत चाललीये. तुम्ही योगा टीचर म्हणूनही काम करु शकता. एका व्यक्तीमागे ५०० रुपयाच्या हिशेबाने तुम्ही ३० ते ३५ हजार रुपये कमवू शकता.


होम ट्यूटर


जर तुम्ही गणित अथवा विज्ञानातून डिग्रीचे शिक्षण घेतलेय तर होम ट्यूटर म्हणून चांगली कमाई करु शकता. फिजिक्स, गणित आणि सायन्स टीचर्सची सध्या गरज आहे. १५ ते २० हजार रुपयांपर्यंत तुम्ही कमवू शकता.