आपल्याला कधीतरी अचानक आपल्याच WiFi चा पासवर्ड लागतो. अशात डोक्यावर ताण देऊनही आपल्याला पासवर्ड  अजिबात आठवत नाही. अशात आपली प्रचंड  चिडचिड होते. पण, आता टेन्शन घेऊ नका, आपला पासवर्ड शोधून काढण्याची भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


Android मधून कसा शोधल पासवर्ड?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Android स्मार्टफोनवरवरून तुमचा वायफाय शोधून काढणं अतिशय सोपं आहे. जर तुम्ही Android 10 किंवा त्यापेक्षा वरील व्हर्जन वापरत असाल तर तुम्ही वायफाय नेटवर्क पासवर्ड सहज पाहू शकतात. 


यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाईसच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. यानंतर वायफाय ऍण्ड नेटवर्कवर जावं. यामध्ये तुम्हाला कनेक्टेड किंवा सेव्ह केलेले नेटवर्क पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला गिअर सारखं आयकन दिसेल. ज्याचा पस्वड हवा आहे त्याचवर त्यावर क्लिक करा. यानंतर पासवर्ड शेअर करा यावर क्लिक करा. 


हा पासवर्ड पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रीन अनलॉक पासवर्ड किंवा फिंगर प्रिंट सेन्सर वापरून फोन अनलॉक करावा लागेल. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक QR कोड पाहायला मिळेल. त्याखाली पासवर्ड लिहिलेला असेल. यामाध्यमातून एकतर तुम्ही पासवर्ड शेअर करू शकतात किंवा QR शेअर करू शकतात.


आयफोनमधून कसा शोधल पासवर्ड ?


आयफोनवरून तुम्हाला वायफाय पासवर्ड शोधायचा असेल तर प्रोसेस जराशी किचकट आहे. याच कारण ऍपलची भक्कम प्रायव्हसी आणि सिक्योरिटी. म्हणूनच तुमच्या आयोफोनवर सेव्ह केलेल्या नेटवर्कचा पासवर्ड शोधून काढणं जवळजवळ असंभव आहे. मात्र यावरही एक उपाय आहे. 


यासाठी तुम्हाला मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असणारा PC लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या आयफोनच्या सेटिंग्सवर क्लाउड ऑप्शनवर जावं लागेल. यावर तुम्हाला कि-चेन हा ऑप्शन मिळेल. यावर टॉगल ऑन करा.    


यानंतर पुन्हा सेटिंग्सवर जा आणि पर्सनल हॉटस्पॉट चालू करा. यानंतर मॅक मशीनला तुमच्या हॉटस्पॉटने कनेक्ट करा. एकदा तुमचा हॉटस्पॉट कनेक्ट झाला की स्पॉटलाईट सर्च ओपन करा यासाठी  (CMD+Space) चा वापर करू शकतात. यानंतर कि चेन ऍक्सेस टाईप करा आणि एंटर करा. 


आता तुम्ही ज्याचा पासवर्ड हवा आहे ते वायफाय नेटवर्क सर्च करू शकतात. यानंतर तुम्हाला एक पॉप अप विंडो पाहायला मिळेल ज्यामध्ये नेटवर्क हिट्स देखील दिसतील. यानंतर शो पासवर्ड वर क्लिक करा. यानंतर सिस्टीम तुम्हाला ऍडमिन युजर क्रीडेन्शियल्स विचारेल. तुम्ही हि माहिती भरल्यावर तुम्हाला पासवर्ड पाहायला मिळेल. 


how to searche forgoten wifi password use these simple tricks