Bank Job: बॅंकेत नोकरी मिळाली की मुलगा/मुलगी सेटल असल्याचे आपल्याकडे आजही मानले जाते. कारण बॅंकेतील नोकऱ्यांमध्ये पगार चांगला मिळतो, सुट्ट्याही बऱ्यापैकी मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेकजण सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात, अशावेळी बॅंकेत नोकरी शोध असा सल्ला दिला जातो. बॅंकेत नोकरी मिळावी असे अनेकांना वाटते पण यासाठी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते? याची माहिती देणारं कोणी नसतं. अनेक बॅंकामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बॅंकेत नोकरी मिळते. पण बारावी उत्तीर्ण असलेल्यांनाही अनेक बॅंकामध्ये नोकरी मिळते. पण बॅंकेत नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी किती शिक्षण हवं? कोणता अनुभव हवा?  नोकरी देणाऱ्या कोणत्या बॅंका कोणत्या आहेत? त्यासाठी तुमच्याकडे काय पात्रता हवी? किती पगार मिळतो? याबद्दल जाणून घेऊया. 


कोणत्या बॅंकांमध्ये संधी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर पुढे देण्यात आलेल्या बॅंकामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. यासाठी बॅंका वेळोवेळी आपल्या करिअर सेक्शनमध्ये भरतीची माहिती देत असतात. याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. सर्वप्रथम बारावी उत्तीर्णांनाही नोकरी मिळते, असा बॅंकाची नावे जाणून घेऊया. 


स्टेट बँक ऑफ इंडिया आणि असोसिएट्स
बँक ऑफ इंडिया
साऊथ इंडियन बँक
बँक ऑफ महाराष्ट्र
सिटी युनियन बँक
आयसीआयसीआय बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक
इंडियन बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
विजया बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
युको बँक
IDBI बँक
एचडीएफसी बँक
पंजाब आणि सिंध बँक


वर देण्यात आलेल्या बॅंकामध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.या बँकांमध्ये IBPS च्या माध्यमातून भरती आणि भरती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 


सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?


IBPS म्हणजे काय?


तुम्ही बॅंक भरती परीक्षेचा विचार करत असाल तर तुम्हाला आयबीपीएसबद्दल माहिती असायला हवे. आयबीपीएस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. राष्ट्रीयीकृत बँकांसाठी भरती परीक्षा आयबीपीएसमार्फत घेतली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षा देतात. बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी आयबीपीएस परीक्षांकडे लक्ष ठेवावे लागेल. 


12वी उत्तीर्णांसाठी बँकेत नोकरी


बारावी उत्तीर्ण उमेदवार आयबीपीएसद्वारे घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँकेत नोकरी मिळवू शकतात. बॅंकामध्ये वेळोवळे लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या नोकऱ्या उपलब्ध असतात. अशा नोकरीसाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. यासोबतच तुम्हाला कॉम्प्युटर आणि टायपिंगचे ज्ञान असेल तर नोकरीत प्राधान्य मिळू शकते.  


कॉम्प्युटर हा आज जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.  म्हणूनच बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थी कॉम्प्युटरची माहिती करुन घेतात. तसेच टायपिंगचा कोर्सही लावतात. अनेकजण हे साधे कोर्स आहेत म्हणत याकडे दुर्लक्ष करतात. पण या कोर्सच्या प्रशिक्षण आणि सर्टिफिकेटमुळे चांगल्या नोकऱ्या मिळतात. तुम्हीदेखील बारावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.


30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात 'अशी' उभी केली 100 कोटींची कंपनी