मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांसाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे.  अशा गंभीर परिस्थितीतही बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या भामट्यांचीही कमी नाही. त्यामुळे योग्य आणि खऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची ओळख असणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योग्य रेमडेसिवीरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट केले आहे. रेमडेसिवीरच्या ओळखीसाठी त्याची तुम्हालाही मदत होईल.



 


या पद्धतीने करावी रेमडेसिवीरची ओळख


  • - 100 मिली. ची बॉटल असते. बॉक्स आणि बॉटलवर तसे स्पष्ट नमूद असते. ही बॉटल उघडल्यानंतर एकदाच वापरात आणली जाते.

  • - सर्व इंजेक्शन 2021 मध्ये बनले आहेत. 

  • - काचेची बॉटल खुपच नाजूक असते.

  • - इंजेक्शन फक्त पावडर स्थितीच मिळते.

  • - बॉक्सच्या मागे बार कोड तयार केलेला असतो.

  • - इंजेक्शनच्या सर्व बॉटलवर RxRemdesivir लिहलेले असते. 

  • - खोट्या रेमडेसिवीरच्या बॉक्सवर पत्त्त्याचे स्पेलिंग चुकवलेले असते. जसे की Telangana चे Telagana


देशात काही ठिकाणी रेमडेसिवीरच्या नावाखाली बनावट इंजेक्शन औषध विकले गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बारामतीत देखील बनावट इंजेक्शन बनवल्यामुळे दोघा तरुणांना अटक झाली होती. 


देशात आणि राज्यात या घटना अत्यंत अपवादात्मक असल्या तरी, फसवणुक टाळण्यासाठी योग्य औषधं - इंजेक्शनची आपल्याला माहिती हवी.